पाथर्डी – ( हरिहर गर्जे ) मरावे परी कीर्ती उपी उरावे या म्हणीस
साजेस असे महान कार्य कै नारायण रामराव शिरसाठ यांनी मरणोपरांत केले असून परंपरागत अंत विधी
प्रक्रियेस फाटा देवून त्यांनी अवयव दान तसेच वैद्यकीय अध्ययन
करण्यासाठी संपूर्ण देहदान केले असून यातून समाजास एक आधुनिक व वैज्ञानिक दृष्टीकोन अंगी
बाळगण्याचा संदेश दिला आहे.

नारायण रामराव शिरसाठ हे मुळचे टेंभूर्णी ता.शिरूर जि,बीड येथील
रहिवासी, वयाच्या विसाव्या वर्षी पासून ते ऐंशी वया पर्यंत अत्यंत पुरोगामी व
विज्ञानवादी वैचारिक व्यक्तिमत्व,या सोबत उत्तम पाककलेचे ज्ञान,अनुभवातून माणसे
किवा प्रांण्याचे हाडे मोडल्यास ते निष्णात पणे बसवण्याचे काम ही अगदी सफाईदार पणे
नारायणराव करत असत. विंचू दंश झाल्यास त्यावर उतारा म्हणून औयुर्वेदिक औषध देत, या
सोबत नाटक,भारुड,बहुरूपी ह्या कला देखील नारायणरावांनी आवडीने अंगी जोपासल्या
होत्या त्यामुळे पंच क्रोशीत ते चांगलेच प्रसिद्धीला पावले होते. नारायणराव त्यांच्या
या सामाजिक कार्यात त्यांना त्यांची पत्नी लोचना,दोन मुली तसेच पुणे येथे शिक्षक
असलेला मुलगा महादेव व खरवंडी येथे भगवान बाबा माध्यमिक विद्यालयात विज्ञान शिक्षक
म्हणून सेवेत असलेलें धर्मराज शिरसाट यांचे कायम सहकार्य व सहभाग असे. नारायण
शिरसाठ यांनी त्यांच्या हयाती मध्ये आधुनिक दृष्टीकोन जपत देहदानाची संकल्पना मुलांना
बोलून दाखवली होती.
नारायण शिरसाट यांचा वयाच्या ८५ व्या वर्षी दिनांक २८/१०/२०२२ रोजी
सकाळी १० वाजता टेंभूर्णी येथे वृद्धापकाळाने मृत्यू झाला त्यामुळे त्यांचा धाकटा
मुलगा धर्मराज शिरसाट यांनी तत्काळ वडिलाची देहदानाची संकल्पना प्रत्यक्षात
आणण्यासाठी डॉ पद्मम्श्री विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कोलेज अहमदनगर यांच्याशी
संपर्क करून सकाळी ११ वाजता हजारो नागरिक व पाहुण्यांच्या उपस्तितीत हरिनामाच्या आणि संत भगवानबाबा,संत वामनभाऊ यांच्या जयघोषात नारायण शिरसाट यांचा देह वैद्यकीय अध्ययना साठी व अवयव दान हेतूने दान
केला.
नारायण शिरसाट यांचा वयाच्या ८५ व्या वर्षी दिनांक २८/१/२०२२ रोजी
सकाळी १० वाजता टेंभूर्णी येथे वृद्धापकाळाने मृत्यू झाला त्यामुळे त्यांचा धाकटा
मुलगा धर्मराज शिरसाट यांनी तत्काळ वडिलाची देहदानाची संकल्पना प्रत्यक्षात
आणण्यासाठी डॉ पद्मम्श्री विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कोलेज अहमदनगर यांच्याशी
संपर्क करून सकाळी ११ वाजता हजारो नागरिक व पाहुण्यांच्या उपस्तितीत हरिनामाच्या
जयघोषात नारायण शिरसाट यांचा देह वैद्यकीय अध्ययना साठी व अवयव दान हेतूने दान
केला. नारायण शिरसाट यांचे धाकटे चिरंजीव धर्मराज यांनी यामागे वडील नारायण यांचा
देह वैद्यकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्ययना साठी तसेच गरजू व्यक्तींना
अवयव दान करून पर्यावरणाचे जतन व संवर्धन करणे असा उद्देश असल्याचे सांगितले.तसेच
पारंपरिक रिती रीवाजस फाटा देवून सावडणे,दहावा,वर्षश्राध हे विधी न करता त्या
खर्चाच्या बदल्यात गरजू गरीब विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचे धर्मराज शिरसाठ
यांनी सांगितले.सदरील अनोख्या व वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून देहदान करण्याच्या
संकल्पनेची परिसरात सकारात्मक चर्चा होत आहे.
0 Comments