पाथर्डी प्रतिनिधी - दुपारची वेळ सूमसान रस्ता,दोन तरुण गाडीवरून आले,घराकडे पायी जाणाऱ्या अंगणवाडी सेविकेला म्हणाले गाडीवर बसा,अंगणवाडी सेविकेने या दोघांचा हेतू ओळखून बसण्यास नकार तर दिलाच मात्र मोठ्या हिमतीने त्यातील एकाचा खिशातून मोबाईल काढून घेतला,व त्याला धरून ठेवत घरच्या दिशेने फरपटत घेऊन चालली,आपण केलेली चाल आपल्या अंगलट आल्याचे लक्षात येताच दुसऱ्याने धूम ठोकली.ही चित्तधारक घटना तालुक्यातीलक पूर्व भागातील एका गावात घडली.या घटनेनंतर जिगरबाज महिलेचे सर्वत्र कौतुक होत असून,अशा संकटाच्या वेळी इतर महिला भगिनींनी देखील घाबरून न जाता अशाच प्रकारची हिम्मत धरावी अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील पूर्व भागातील एका गावामध्ये अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या महिलेला घरी जात असताना शेवगाव तालुक्यातील दोन दुचाकीस्वार आले व गाडीवर बसा आम्ही तुम्हाला घरी सोडतो असे म्हणू लागले.यावर अंगणवाडी सेविका असलेल्या महिलेने मला दोन पाय आहेत.मी स्वतः चालत घरी जाईल असे ठणकावून सांगितले.यानंतर हे दोघे तिथून निघून गेले.मात्र रस्ता निर्मनुष्य असल्याचे पाहून पुन्हा दोघांनी येऊन संबंधित महिलेला गाडीवर बसण्याची विनंती केली.यानंतर मात्र या महिलेने दुर्गेचे रूप धारण करत मोठ्या हिमतीने मागे बसलेल्या एकाचा त्याच्या खिशातून मोबाईल काढून घेत आपल्या पिशवीमध्ये टाकला.व त्याला हाताने धरून ठेवत आपल्या घराकडे फरपट घेऊन निघाली.हे अनपेक्षित असणारे दृश्य पाहून पुढे बसलेला जोडीदार घाबरला व त्याने लगेच तिथून धूम ठोकली.अशा गडबडीत सुद्धा महिलेने आपल्या घरी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला.मात्र घरून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने या महिलेने आपल्या वरिष्ठांना भ्रमणध्वनी वरून हकीगत सांगितली.वरिष्ठांनी देखील तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.तोपर्यंत या महिलेचा आरडाओरडा ऐकून गावाजवळील लोक जमा झाली.व त्यांनी या युवकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले.एकटी महिला असून देखील तिने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.तसेच कुठल्याही संकटाच्या काळी महिलांनी घाबरून न जाता,धीराने तोंड द्यावे असे देखील येथे उपस्थित असलेल्या नागरिकात चर्चा सुरू झाली.याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
0 Comments