सिंघम स्टाईलने संतोष खाडे पथकाकडून कारवाई !

 

पाथर्डी - तालुक्यासह शहरातील अनेक मावा कारखान्यावर व टपऱ्यावर दुपार पासून पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्यासह पथकाने धडक कारवाई करत ४ लाखांचा मुद्देमाल व दोन आरोपी ताब्यात घेतले असून या कारवाई मुळे पाथर्डी तालुक्यातील अवैध धंदे वाल्यामध्ये खळबळ उडाली आहे.

 

पाथर्डी शहरात यापूर्वी स्मार्ट पोलिसांचा अभाव असल्याने गेले अनेक वर्षापासून सकाळी व सायंकाळी ,रहदारीच्या वेळी चौका चौकात टवाळखोर रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्किंग करून ट्राफिक जाम करतात, याशिवाय शाळा, कॉलेज भरते सुटते वेळी फॅन्सी नंबरच्या गाड्याला कर्णकर्कश होर्न व सायलेन्सर लावून आवाज करणाऱ्या दुचाकी वर बसून शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या युवकांवर स्थानिक पोलीसा कडून कारवाई होत नसल्याने पालक वर्ग हवालदिल झाला होता, अशातच आज दुपारनंतर पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने पाथर्डी तालुक्यातील खरवंडी तसेच तालुक्यातील इतर ग्रामीण भागात बेकायदा सुगंधित सुपारी व मावा विकणाऱ्या कारखान्यावर व टपऱ्यांवर धडक कारवाई केली, अचानक झालेल्या या धाडीमुळे मावा विक्रेत्या मध्ये खळबळ उडाली, अनेक मावा विक्रेत्यांनी पथका सोबत युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला असता पथकाने अश्याना काठीचा प्रसाद वाटप केला त्यामुळे अनेकांनी घरांना कुलपे लावून पोबारा केला, तालुक्यासह शहरात विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यातून उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने ४ लाख रुपयांचे सुगंधित सुपारी,मावा यासह मावा बनवणारे मशीन जप्त केले आहे. याशिवाय दोन आरोपींना ताब्यात घेतली असून रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती,

या कारवाईत परीक्षा विधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्यासह, अहिल्यानगर शहर विभाग, पोसई राजेंद्र वाघ,शकील शेख,पोहेका शंकर चौधरी,पोहेकॉ दिगंबर कारखेले, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकॉ भिंगारदिवे, पोकॉ उमेश खेडकर,पोहेकॉ सुनिल पवार, पोहेकॉ अजय साठे,पोहेकॉ मल्लिकार्जुन बनकर,पोकॉ अमोल कांबळे, पोकों अक्षय भोसले, पोकॉ सुनिल दिघे,पोकॉ संभाजी बोराडे यांनी सहभाग नोंदवला.

सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शहरातील वसंतराव नाईक पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत तसेच शेवगाव रोड वरती पथकाने पायी गस्त घालत रस्त्यात असलेले बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाई केली, यावेळी टवाळक्या करणारे युवक,फॅन्सी नंबर प्लेट गाड्या धारकांना पथकाने खाक्या दाखवत टवाळखोराना काठीचा प्रसाद दिला त्यामुळे रस्त्यावर पळापळ होवून वाहने गायब झाली.पाथर्डी मधील नागरिका मधून या कारवाईचे स्वागत केले जात आहे.  

 


Post a Comment

0 Comments