अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी – आ.मोनिका राजळे

पाथर्डी – गेल्या १० दिवसापासून पाथर्डी व शेवगांव तालुक्यात सततच्या अति पावसामुळे खरीप हंगामातील हाता-तोंडाशी आलेले शेतकऱ्याचे पिके वाया गेली असून प्रशासनाच्या वतीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे होवून शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची मागणी आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे. 



अतिवृष्टीने कपाशी तूर बाजरीसोयाबीनमका आदि पिके तसेच फळ बागांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. पावसाचा जोर अजुनही कायम असल्याने उभ्या पिकांमध्ये सर्वत्र पाणी साठलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्याना  पीकांचे सरसगट पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळणेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांना आ.राजळे यांनी निवेदन दिले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसना. राधाकृष्ण विखेमंत्री महसूल तथा पालकमंत्री अहमदनगर यांना पत्र देवून कळविले आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी अहमदनगर शेवगांव व पाथर्डीचे तहसिलदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांना  सरसकट पंचनामे करणे संबंधी सूचना  देण्यात आलेल्या आहेत.

 

Post a Comment

0 Comments