दिवाळी निमित्त मोहल्ला कमिटी कडून कपडे, किराणा वितरण


पाथर्डी - शहरातील मुस्लिम मोहल्ला म्हणजेच मौलाना आझाद चौकातील हिंदू गरीब कुटुंबाला दिवाळीनिमित्त मुस्लिम जमात कडून कपडे,किराना व इतर वस्तू मदत करण्यात आली आहे .

यावेळी हाजी महेबूबभाई हलवाई,रसूल मंडपचे संचालक हाजी बहादूरभाई आतार, वसिमभाई मनियार,मौलाना जावेद साहब व जाबीरभाई उपस्थित होते.नेहमी कोणत्याही प्रकारे प्रसिद्धीची हाव न ठेवता पडद्यामागून मोलाची मदत करणारा चेहरा म्हणून या मुस्लिम कमेटीला ओळखले जाते.गेली अनेक वर्षापासून दर महिन्याला तालुक्यातील सर्वधर्मीय अनेक वंचित पात्र गरिबांना मदत करणाऱ्या या मोहल्ल्यातील कमिटीने आज पुन्हा एकदा मानवतेचे दर्शन घडवले, एक हातकी मदद दुसरे हात को भी मालूम नही होनी चाहिए या घोषवाक्याची या कमिटीने नेहमीच सतर्कता ठेवलेली असली तर या छोट्याश्या मदती मधून सामाजिक सलोखा व इतरा प्रती मदतीची भावना वाढीस लागावी म्हणून हे आदर्श उदाहरण त्यांनी समाजा समोर ठेवले आहे. वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी मौलाना जावेद यांचे पुढाकाराने असे समाजहिताचे प्रकल्प राबवले जातात यावेळी बोलतांना हाजी बहादूरभाई आतार यांनी सांगितले कि पाथर्डी शहरातील सर्वच समाजातील सधन व्यक्तींनी आपल्या शेजारीपाजारी असणाऱ्या गरिबाच्या घरी जाऊन मिठाई,कपडे व दिवाळी फराळ वाटप करून दिवाळी आनंदाने साजरी करावी.

 

Post a Comment

0 Comments