पाथर्डी - स्व.लोकनेते माजी आमदार राजीवजी राजळे यांच्या ५३ व्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी या ठिकाणी माजी नगरसेवक रामनाथ बंग मित्र मंडळाच्या वतीने दोन हजार लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण सोहळा आज शंकर महाराज मठाचे मठाधिपती परमपूज्य माधव बाबा,भैरवनाथ देवस्थानचे प्रमुख भाऊसाहेब मर्दाने,हभप शशिकांत महाराज सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी माजी आमदार स्व.राजीव राजळे यांच्या जयंतीनिमित्त रामनाथ बंग मित्र मंडळाकडून पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक रामनाथ बंग,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सचिन दरंदले,खरेदी विक्री संघाचे संचालक राजेंद्र गुगळे,अशोकराव साठे,नाभिक संघाचे माजी अध्यक्ष रामकिसन पंडित,सामाजिक कार्यकर्ते बंडूशेठ दानापुरे,राजेंद्र दुधाळ,डॉ सचिन गांधी,डॉ रामराव बारगजे,रामभाऊ बजाज,ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार दायमा,अविनाश मंत्री,उमेश मोरगावकर,अनिल खाटेर,किशोर परदेशी,राजेंद्र कोटकर,सचिन नागापुरे यांच्या हस्ते भाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत रोडी यांनी केले तर प्रास्ताविक सचिन नागापुरे यांनी तर आभार बबलू वावरे यांनी मानले.
0 Comments