पाथर्डी - नगरपरिषद पाथर्डी निवडणूक २०२५ चे मतदान
शनिवार दि. २० डिसेंबर रोजी होत असून प्रचाराची रणधुमाळी शिगेला
पोचली आहे. भारतीय जनता पार्टीचे वतीने नगराध्यक्षसह १० प्रभागातील २० जागेवर
उमेदवार उमेदवारी करीत असून या उमेदवारांचे प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे
लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांची जाहीर सभा गुरुवारी दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता वीर सावरकर मैदान, भाजी बाजारतळ, पाथर्डी येथे आयोजित केलेली आहे. यावेळी जलसंपदा मंत्री तथा
पालकमंत्री अहिल्यानगर ना. राधाकृष्णजी विखे पाटील, यांचेसह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी
उपस्थित राहणार आहेत.
- मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या कडे येथील भाजपा पदाधिकार्यांनी विरोधकांच्या कुटील डावपेचा बाबत तसेच विरोधकांच्या बेकायदा धंद्या बाबत, शासकीय तसेच पालिकेच्या खुल्या भूखंडा वरील अतिक्रमना बाबत,वर्ग २ जमिनी वरील विना परवाना बांधकामा बाबत कानगोष्टी केल्या असून त्याबाबत पुढील कालावधीत ठोस हालचाली होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त सुत्रा कडून मिळाले आहे.
- या सभेत मुख्यमंत्री पाथर्डी शहरासाठी नवीन पाणीयोजना, न्यायालयाची इमारत,रस्ते, आरोग्य,शेती यांच्या विकासाच्या योजना बाबत नव्याने काय घोषणा करणार याबाबत लक्ष लागले आहे.
या जाहीर सभेसाठी पाथर्डी शहरातील मतदान बंधू - भगिनींनी
व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार मोनिका राजळे
यांनी केले आहे.

0 Comments