पाथर्डी - तालुक्यातील
करंजी येथे एका पान टपरीचालकाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून त्याच्या जवळील १५
हजार रुपये लुटून नेल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला होता.
या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा
दाखल करण्यात आला असून पानटपरी चालक चैतन्य शंकर माने (रा.कामतशिंगवे, ता. पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की
शुक्रवारी रात्री पान स्टॉलसमोर सुमित तिजोरे व श्रीजय तिजोरे (रा. कासार पिंपळगाव)
यांच्यासह चार अनोळखी तरुण आले. तिजोरे याने दमदाटी करत पानटपरीत घुसून गावठी कट्ट्याचा
धाक दाखवत १५ हजार रुपये काढून घेतले. या प्रकाराबाबत कोणाला काही सांगू नको तुला
रात्री अपरात्री गावाकडे ये जा करावी लागते अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले
आहे. हा प्रकार सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यात कैद झाला होता या प्रकरणी पाथर्डी पोलिस
उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांनी आरोपी सुमित तिजोरे व श्रीजय तिजोरे यांना अटक करून
पाथर्डी येथील न्यायाधीश किरण सपाटे यांच्या समोर हजर केले असता दोनही आरोपींना
तपासकामी दोन दिवसाची पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले होते.तपासा दरम्यान
पोलिसांनी आरोपी कडून गुन्ह्यात वापरलेला कट्टा हस्तगत केलेला आहे. फिर्यादी तर्फे
सरकारी वकील अबोली कुलकर्णी यांनी तर आरोपी तर्फे वकील संतोष ढमाळ यांनी काम पहिले.
अटक दोनही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.
.jpg)
0 Comments