पाथर्डी : - सध्याचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग आहे . या दृष्टीने विकसित व आत्मनिर्भर भारत 2047 यासाठी संपूर्ण देश पातळीवर प्रयत्न सुरू आहेत या अनुशंगाने शासकीय स्तरावरून विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत.या प्रयत्नाचा एक भाग म्हणून विज्ञान प्रदर्शन हे अत्यंत आवश्यक आहेत कारण यातूनच भविष्यातील शास्त्रज्ञ घडतील व तंत्रज्ञानात प्रगती घडवतील असा सार्थ विश्वास वाटतो असे प्रतिपादन शिवाजी कराड , गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पाथर्डी यांनी केले .
पंचायत समिती शिक्षण विभाग ,पाथर्डी , विज्ञान - गणित अध्यापक संघटना व संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 53 व्या तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रदर्शन प्रमुख रामनाथ कराड , सहदेव दादा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेंद्र शिरसाट , प्राचार्य सुरेश मिसाळ तिलोक जैन विद्यालयाचे प्राचार्य अजय भंडारी ,विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील कटारिया , गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष राजू पवार या सह संघटनेचे पदाधिकारी संपत घारे ,चंद्रकांत उदागे ,आदिनाथ शिदोरे , धर्मराज शिरसाट , संतोष लोव्हाडे , अरुण नेहूल , सुभाष सोनवणे , सुनील शिरसाट . विविध विद्यालयाचे मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख , विविध संघटनांचे पदाधिकारी श्री गहिनीनाथ शिरसाट, बाळासाहेब गोलार , सुनिल खेडकर, अशोक कराड, रामदास दहिफळे, राजेंद्र जायभाय, बाळासाहेब वामन, मुजीब इनामदार, भास्कर बारगजे, राहुल अकोलकर, संतोष कुसाळकर, आण्णासाहेब फलके, सीताराम सावंत,उपस्थित होते .
यावेळी या प्रदर्शनाचे प्रास्ताविक करताना प्रदर्शन प्रमुख रामनाथ कराड यांनी प्रदर्शनाची सविस्तर माहिती दिली.तीन दिवस या ठिकाणी विज्ञान यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार असून तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक मिळून 404 शाळांनी सहभाग घेतला असून ही बाब निश्चित गौरवास्पद आहे असे प्रतिपादन केले. विशेष म्हणजे सर्व उपकरणांचे नि:पक्षपातीपणे परीक्षण व्हावे यासाठी नेवासा शेवगाव व नगर तालुक्यातील विज्ञान व गणिताचे तज्ञ शिक्षक परीक्षक म्हणून निमंत्रित केल्याची माहिती दिली .तसेच यावेळी जिल्हा विज्ञान अध्यापक संघटनेच्या वतीने तालुक्यातील इयत्ता सहावी व नववी या वर्गासाठी घेतलेल्या स्पर्धा परीक्षेतील जिल्हा विज्ञान गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.जिल्हा संघाचे सदस्य तथा तालुकाध्यक्ष सुनील कटारिया यांनी सातत्याने वर्षभर प्रयत्न करून या स्पर्धेचे अतिशय अचूक व नेटके नियोजन करून तालुक्यातील अगदी ग्रामीण भागातील या स्पर्धेच्या माध्यमातून विज्ञान विषयात रुची निर्माण केल्याबद्दल त्यांचे देखील विशेष कौतुक केले.या ठिकाणी अगदी कमी कालावधीत या प्रदर्शनाचे अचूक व नेटके नियोजन केल्याबद्दल सहदेव दादा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेंद्र शिरसाट , प्राचार्य सुरेश मिसाळ व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक वृंद यांचे शिवाजी कराड व रामनाथ कराड यांनी विशेष अभिनंदन केले .सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रदर्शन प्रमुख रामनाथ कराड यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष काळोखे व नऱ्हे मॅडम यांनी करून आभार सहदेव दादा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेंद्र शिरसाट यांनी मानले.

0 Comments