पाथर्डी- सुवर्णकार व्यवसायातील नितीन सुधाकर उदावंत वाघोली(पुणे) या व्यापाऱ्याचे सोन्याचे उधारीचे राहिलेले दोन लाख रुपये देण्यास टाळाटाळ करून ती रक्कम बुडवण्याच्या उद्देशाने पाथर्डी येथील दोघे आरोपी व गेवराई जिल्हा बीड येथील एक आरोपी यांनी त्रास दिल्याने व्यापाऱ्याने कंटाळून सेवन करून आत्महत्या केल्याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघोली येथील सोने व्यापारी नितीन उदावंत यांनी पाथर्डीच्या ओम टाक व प्रशातं टाक यांना दोन लाख रुपयाचे सोने निलेश माळवे रा. गेवराई यांच्या मध्यस्तीने उधार दिले. उधारीचे पैसे मागायला आल्यानंतर उदावंत यांना टाक बंधु शिवीगाळ दमदाटी करीत असत. १६ मार्च २०२३ रोजी उदावंत पाथर्डीला टाक यांच्याकडे येवुन गेले होते. आठ दिवसानंतर पैसे देवु असे सांगितले.त्यानंतर २५ मार्च रोजी उदावंत पाथर्डीला आले. टाक यांच्याकडे उधारीचे पैसे मागितले. त्यावेळी त्यांना सिवीगाळ रुन शिवीगाळ करून कोणेतरी द्रव पदार्थ सेवन करण्यास टाक व माळवे यांनी भाग पाडले.
त्यानंतर उदावंत हे पुणे येथे एसटीने जात असताना करंजी घाटात त्यांना त्रास होत असल्याने वाहकाने अँमब्युलस बोलावली पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उदावंत यांना दाखल केले.त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यु झाला होता. उदावंत यांनी पाथर्डीतुन एसटीबसमधे बसल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना फोन वरुन मँसेज करुन घटनेबाबत सांगितले होते. तसेच काही नातेवाईकांना फोन करुनही हकीगत कळविली होती. त्यानंतर त्यांचा पंधरा मिनीटात मृत्यु झाला आहे. उदावंत यांचे भाऊ यांनी पोलिसात ओम छगनराज टाक, प्रशांत छगनराज टाक दोघे रा. पाथर्डी, निलेश सुधाकर माळवे.रा. गेवराई यांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संगणमताने आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिघाविरु्दध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक कौशल्यरामनिरंजन वाघ तपास करीत आहेत.अरविंद चव्हाण त्यांना सहकार्य करीत आहेत.
0 Comments