शेतकऱ्याला लुटणाऱ्या बज्याला पोलिसाकडून बेड्या !

 

पाथर्डी – पाडळी येथील शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवून पन्नास हजारांची रोकड व मोबाईल लुटणारा आरोपी बज्या उर्फ शिवराज हरिचंद्र मरकड यास पाथर्डी पोलिसांनी अटक केली असून याबाबत दाखल गुन्ह्यात पोलीस तपासात सदर आरोपी कडून परिसरातील आणखी काही गुन्ह्याची उकल होण्याची माहिती पोलीस तपासात मिळाली आहे.  

फिर्यादी पोपट तुकाराम तांदळे राहणार इंदिरानगर पाडळी तालुका पाथर्डी हे एकत्र कुटुंबासह राहत असून शेती व्यवसाय करतात, तांदळे यांचे घरकुलाचे बांधकाम सुरु असल्याने दिनांक १६ जून २०२५ रोजी तिसगाव येथून सिमेंटच्या गोण्या आनण्यासाठी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पाडळी येथील घरातून रोख रक्कम पन्नास हजार रुपये घेवून तिसगाव येथे जाण्यासाठी रस्त्यावरून फिर्यादीचे ओळखीचे बज्या उर्फ शिवराज हरिचंद्र मरकड व त्याचे इतर दोन अनोळखी मित्र B Z 5 गाडीवरून फिर्यादीकडे आले व फिर्यादीला गाडीवर बसवून फिर्यादीची दिशाभूल करून गाडी तिसगाव कडे न नेहता निवडूगे शिवारात आणून आरोपी बज्या उर्फ शिवराज हरिचंद्र मरकड व इतर दोन अनोळखी आरोपींनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून लाथा बुक्यांनी मारहाण करून ५० हजार रोख रक्कम व एम आय कंपनीचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल बळजबरीने चोरून नेह्ला असून घडले प्रकाराबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीसानी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने आरोपीस ५ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. आरोपी कडून आणखी काही गुन्ह्याची उकल होण्या इतपत माहिती पोलीस तपासात मिळाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे हे करत आहेत.


Post a Comment

0 Comments