सुनेचा विनयभंग केल्या प्रकरणी मावस सासऱ्याला २ वर्षाची शिक्षा !

पाथर्डी – शहराच्या जवळच असलेल्या गावातील महिलेचा पती रात्री कामावर गेल्याचा गैरफायदा घेवून मावस सासऱ्यानेच एकट्या असलेल्या पिडीत महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याच्या कारणावरून न्यायालयात दाखल खटल्यात आरोपी भास्कर आश्रुबा दहिफळे यास भादवी ४५२ व ३५४ या कलमाखाली येथील न्यायाधीश व्ही.आय.शेख यांनी दोन वर्ष साधी कैद व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

पाथर्डी तालुक्यातील एका गावात पिडीत,फिर्यादी महिला तिच्या पती व मुलासोबत रहात असून दिनांक २६/०२/२०१७ रोजी रात्री पिडीत फिर्यादी महिलेचा पती रात्री कामावर गेला असल्याचे हेरून व पीडित महिला घरात रात्रीच्या वेळी एकटी असल्याचा गैरफायदा घेवून आरोपी भास्कर आश्रुबा दहिफळे हा अनाधिकाराने पिडीत महिलेच्या घरात घुसला व त्याने पिडीतेशी लगट करून पिडीतेचा विनयभंग केला त्यास पिडीतेने प्रतिकार केला असता आरोपी भास्कर दहिफळे याने पिडीतेचे तोंड दाबून सदर घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली व तेथून आरोपी पळून गेला त्यामुळे दुसरया दिवशी पिडीतेने तिच्या पतीला हकीगत सांगितली असता पतीने आरोपी भास्कर दहिफळे यास जाब विचारला असता आरोपीने रागाने पिडीतेच्या पतीला व पिडीतेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यामुळे पिडीतेने पाथर्डी पोलीस ठाण्यात आरोपी भास्कर दहिफळे विरुद्ध भा.द.वी कलम ४५२,३५४,३२३,५०४,५०६ प्रमाणे फिर्याद दाखल केली होती.

सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार एम.एस.पठाण यांनी करून न्यायालयात सन २०१८ मध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते.सदरील खटल्यात फिर्यादी पक्षा तर्फे सरकारी वकील श्री नितीन एस. भिंगारदिवे यांनी एकूण ४ साक्षीदार तपासले तसेच आरोपी पक्षाच्या वतीने सदरील खटला पूर्ववैमनस्यातून खोट्या आशयाच्या आधारे दाखल करण्यात आल्याचा बचाव करण्यात आला मात्र सरकारी पक्षाने सदरील केस मध्ये आरोपीने पिडीतेचा तिच्या घरात घुसून विनयभंग केला असल्या बाबत पुरावे समोर आणल्याचे गृहीत धरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तथा न्यायाधीश व्ही.आय.शेख यांनी सदरील खटल्याचा निर्णय देताना आरोपी भास्कर आश्रुबा दहिफळे हा पिडीतेच्या घरात अनाधिकाराने घुसल्याच्या गुन्ह्या करिता १ वर्ष साधी कैद व २५००/- रुपये दंड तसेच पिडीतेचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्या करिता १ वर्ष साधी कैद व २५००/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली असून दोनही शिक्षा एकत्रात भोगावयाच्या असून दंडाच्या रकमे पैकी ३ हजार रुपये पिडीत महिलेला नुकसानभरपाई देण्याचा आदेश करण्यात आला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने वकील श्री नितीन भिंगारदिवे यांनी काम पहिले. 

Post a Comment

0 Comments