पाथर्डी - शहरातील कचरा संकलनाचा
बोजवारा उडाला असून शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील कचरा संकलन होत नसल्याने
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिल्याने प्रभागाच्या नगरसेविका दिपाली बंग
यांनी निवेदनाद्वारे या बाबत प्रश्न सोडवण्याची मागणी मुख्याधिकारी यांच्या कडे
केली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील कचरा वेळेवर संकलन होत
नसल्याकारणाने प्रभागाच्या नगरसेविका दिपाली रामनाथ बंग व माजी नगरसेवक रामनाथ बंग
यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांचे कडे
शहरातील तसेच प्रभाग ७ मधील घंटागाडी अनियमित कचरा संकलन करत असून याबाबत
कर्मचाऱ्यां कडे अनियमित कचरा का संकलन करता विचारणा केली असता कर्मचार्यांनी
आम्ही रोजंदारीने तीनशे रुपये प्रमाणे काम करत आहोत त्यामुळे आम्हाला
सांगितल्यानुसार आम्ही चार तास काम करणार
आहोत असे सांगितले जाते असे उत्तर मिळाले,त्यामुळे पालिकेत
तोंडी स्वरूपात तक्रार केली असता अद्यापही या कामांमध्ये सुधारणा झालेली नाही असे
गाऱ्हाणे मांडले. प्रभाग हा भौगोलिक दृष्ट्या फार दाट लोकवस्तीचा आहे चिंचपूर रोड
भंडार गल्ली ते आझाद चौक मुस्लिम गल्लीपर्यंत व मेन रोड चा बराचसा भाग प्रभागात
येतो तरी आपण यामध्ये लक्ष घालून कचरा नियमित गोळा करता येईल याची दखल घ्यावी अशा प्रकारचे पत्र काल पाथर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे
यांना ज्येष्ठ नेते अशोक मंत्री,माजी नगरसेवक रामनाथ बंग,माजी उपनगराध्यक्ष दिपाली बंग, दिव्या कलंत्री,
सचिन मुनोत, बबलू वावरे,हर्षल
लूनावत व इतर यांनी दिले आहे.
0 Comments