खरेदी विक्री संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा कार्यकर्ता मेळावा

पाथर्डी -  तारखेपासून निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरवात झाली असून कोणतीच निवडणूक ही सोपी नसते. मार्केट कमिटी निवडणुकीत सर्वांच्या सहकाऱ्यांने आपल्याला अपेक्षा पेक्षा जास्त यश मिळालं. उमेदवारी देण्याचं काम हे अवघड आहे पण सर्वांना न्याय देण्याची आमची भूमिका असेल त्यामुळे कोणीही नाराजी बाळगू नये. विरोध हा प्रत्येक तालुक्यात असून हे तालुक्याच्या विकासासाठी चांगल्या कामासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचे आहे. खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील साईनाथनगर येथील आमदार कार्यालय व्हाईट हाऊस येथे सर्व संस्था प्रतिनिधी,मतदार,सर्व पदाधिकारी, सभासद यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी आमदार मोनिकाताई राजळे बोलत होत्या.

यावेळी अभय आव्हाड,नंदकुमार शेळके,विष्णुपंत अकोलकर, मृत्युंजय गर्जे,सुभाष बर्डे,धनंजय बडे,अर्जुनराव शिरसाट,काशिनाथ पाटील लवांडे,अमोल गर्जे,अनिल बोरुडे,संजय बडे,हिंदकुमार औटी,माणिकराव खेडकर,अजय भंडारी,शुभम गाडे,नारायण धस,एकनाथ आटकर आदींसह तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments