पाथर्डी -
वंजारि सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित उत्तर महाराष्ट्र मेळावा २०२३ नांदूर
शिंगोटे ता. सिन्नर येथे पार पडला.त्या मेळाव्याला राज्यभरातून समाजातील अनेक मान्यवर व आजी माजी आमदार तसेच
वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थीत होती. वंजारि सेवा संघाचे अध्यक्ष राहुल
जाधवर,तसेच देवेंद्र बारगजे, बाजी दराडे व संघटनेतील
पदाधिकार्यांनी हा मेळावा अत्यंत नियोजनपूर्वक यशस्वी पार पाडला. या मेळाव्या प्रसंगी
सामाजिक,शैक्षणिक, राजकीय व
उद्योगक्षेत्रात चांगली कामगिरि करणार्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले.
त्यापैकी पाथर्डी तालुक्यातील आद्यक्रांतीकारक राजे धर्माजी प्रतापराव गर्जे यांचे
वंशज नागनाथ गर्जे यांना ते करत असलेल्या ऐतिहासिक व सामाजिक कार्याची नोंद घेऊन
त्यांना वंजारि सेवा संघ या राज्यस्तरिय संघटनेने "समाज भूषण "हा
पुरस्कार देऊन गोरविण्यात आले. त्याबद्दल नागनाथ गर्जे यांचे खासदार सुजय दादा
विखे यांनी अभिनंदन करून पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या.
0 Comments