विश्वविनायक मल्टीस्टेटच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन !

पाथर्डी - विश्वविनायक मल्टीस्टेटच्या दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन व माहितीपट रथ लोकार्पण सोहळा शेवगाव येथील संस्थेच्या शाखेत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील व शेवगाव तालुक्याचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी दिगंबर भदाणे पो.नि.(शेवगाव) संतोष मुटकुळे पो.नि.(पाथर्डी) सचिन लिमकर पो.उप.नि. यांची उपस्थिती होती.डिजिटल युगात माहितीची देवाणघेवाण यासाठी विविध साधनांचा उपयोग होतो.अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये  संस्थेच्या योजना प्रचार करण्यासाठी माहितीपट रथ लोकार्पण यावेळेस करण्यात आला.

या माहितीपट रथातून संस्थेच्या विविध योजना सर्वसामान्य ग्रामीण लोकांपर्यंत पोचवून संस्थेच्या योजनांचा त्यांना लाभ घेता येईल असे प्रतिपादन विश्वविनायक मल्टीस्टेटचे चेअरमन मोदक शहाणे यांनी केले. यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष (शिंदे गट )आशुतोष डहाळे,रवींद्र शेठ डहाळे ,येडेश्वरी अर्बनचे आशिष थोरात, जवरे ,डॉ संदीप येंडे ,सुरेश  कुलथे,लक्ष्मण पावटेकर,कानिफ कराळे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अतुल भोसले तर आभार प्रदर्शन दादासाहेब येडे सर यांनी केले.

 

Post a Comment

0 Comments