देवाची करणी अन् विहिरीत पाणीच पाणी

 


कडा - शुक्रवारचा दिवस सायंकाळची साडेपाच वाजेची वेळ, सर्वत्र सुसाट्याचं वादळ, विजेचा कडकडाट अन् पावसाने दमदार हजेरी लावताच, प्रत्येकजण घराची वाट जवळ करत होता. तेवढ्यात मोठा कडकडाट झाला. आणि अमोलक जैन संस्थेच्या विहिरीत विज कोसळली. अन् देवाची करणी म्हणावी की काय, बघता बघता अक्षरश: कोरड्या पडलेल्या विहिरीत भर उन्हाळ्यात  पाणीच पाणी झाले.

आष्टी तालुक्यात कडा परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी वा-यासह विजेचा कडकडाट सुरु झाला. अन् दमदार पावसाने हजेरी लावली. घराकडे वाट करण्यासाठी नागरीकांची पळापळ चालू असतानाच, तेवढ्यात विजेचा मोठा कडकडाट झाला. अन् माहिती घेतली असता, समजले की श्री. अमोलक जैन शिक्षण संस्थेच्या परिसरातील पन्नास वर्षापूर्वीच्या कोरड्या पडलेल्या एका विहिरीत ती विज कोसळली. अवघ्या काही क्षणातच हा दैवी चमत्कार म्हणावा की काय, असाच अद्भूत प्रकार निदर्शनास आला. अक्षरश: या मार्चच्या तप्त उन्हाळ्यात त्या कोरड्या पडलेल्या विहिरीत भरमसाट पाणी पाहायला मिळाले. देवाची करणी अन् विहिरीत बघता बघता पाणीच पाणी झाले. त्या विहिरीत आलेलं पाणी पाहण्यासाठी मात्र अनेकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. 

-----------%%-------

Post a Comment

0 Comments