ऐन निवडणुकीत बिबट्यांचा वावर वाढला !


कडा ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आष्टी तालुक्यातील हिवरा परिसरात दोन बिबट्यांचा वावर वाढला आहे, गुरूवारी सायंकाळी लगड वस्तीवरील मुरलीधर लगड यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार मारले, विशेष म्हणजे त्यांचे नातू विकास पोपट लगड यांच्यासमोर कुत्र्यावर  हल्ला केला त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथुन धुम ठोकली. या परिसरात दोन बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. याप्रकरणी वनविभागाने घटनास्थळी जावुन पाहणी केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिवरा परिसरात दहा दिवसांपुर्वीही शेतकऱ्यांना दोन बिबट्यांचे दर्शन झाले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी ढगे  व कडा राउंडचे वनपाल मोहळकर  यांच्या आदेशावरून मौजे पिंपरखेडचे वनरक्षक के. बी. विधाते मॅडम,  एस. आर. शेख, के.आर.पवार, ए.डी. पाथरकर यांनी मौजे हिवरा येथे येऊन प्रत्यक्ष हिंडून फिरून पाहणी करून त्याच्या पाऊल खुणावरून व कुत्रा मारल्यावरून तो बिबट्या आहे अशी खात्री केली. शेतकऱ्यांनी शेतीची कामे करत असताना रात्री टॉर्च सोबत ठेवून मोबाईलचे गाणे मोठ्याने सुरू ठेवा जेणे करून आपली चाहूल बिबट्याला लागली पाहिजे. कामे करत असताना सावधानता बाळगण्याचे आव्हान वनरक्षक विधाते मॅडम यांनी केले. बिबट्या पुन्हा आढळून आल्यास  वरिष्ठ अधिकाऱ्यांना पिंजऱ्याची मागणी करून बंदोबस्त करण्यात येईल असेही विधाते यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments