जाणिवांची फुले' ला सर्वोत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार

पाथर्डी - प्रसिद्ध साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांनी लिहिलेल्या 'जाणिवांची फुले' या बालकथा संग्रहास सोलापूर येथील कै.निर्मला मठपती यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा सर्वोत्कृष्ट बालसाहित्य साहित्य पुरस्कार २०२२ जाहीर झाला आहे.


मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका कै.निर्मला मठपती यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आलेल्या कै.निर्मला मठपती फाउंडेशनच्या अध्यक्ष शिवांजली स्वामी यांनी कादंबरी, ललित लेख व बालसाहित्य या प्रकारातील पुरस्काराची घोषणा केली.पुरस्काराचे हे द्वितीय वर्ष आहे. या पुुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे असुन पुरस्कार वितरण समारंभपूर्वक ३० ऑक्टोबर २०२२ रोजी सोलापूर येथे संपन्न होणार आहे. 


'जाणिवांची फुले ' हा डॉ. कैलास दौंड यांचा बालकथासंग्रह ५ सप्टेंबर २०२१ रोजी नांदेडच्या दत्ता डांगे यांच्या इसाप प्रकाशनाने प्रकाशित केला. यातील बहुतांश बालकथा 'किशोर' मासिकामधून पूर्व प्रसिद्ध झालेल्या आहेत.  बाल वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या या बालकथा आहेत. डॉ. दौंड यांचे या पुरस्काराबद्दल डॉ. अनंता सूर, मीरा शेंडगे यांच्या सह शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.  

Post a Comment

0 Comments