मानवी शरीरा व्यतिरिक्त जगामध्ये कुठेही कृत्रिम रित्या रक्त तयार होत नाही. यामुळे विविध प्रकारच्या रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रक्ताची गरज केवळ मनुष्यच भागवू शकतो.यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने वर्षातून किमान दोनदा रक्तदान करावे,असे आवाहन आर्य भांडकर यांनी पाथर्डी येथे रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
पुढे बोलताना भांडकर म्हणाले की,भारत देश हा युवकांचा देश म्हणून जगभर ओळखला जातो.युवकांनी ठरवले तर काहीच अशक्य नाही.यामुळे युवकांनी रक्तदान चळवळी हि लोक चळवळ करण्यासाठी पुढाकार घ्यावा व रक्ताची कधीही कमतरता भासणार नाही यासाठी प्रत्येकाने वर्षातून दोनदा रक्तदान करून या चळवळीत योगदान द्यावे असे आवाहन केले.आजच्या आधुनिक युगात देखील समाजामध्ये रक्तदानाविषयी अनेक गैरसमज आहेत.ते दूर होणे गरजेचे आहे.रुग्णांना व रक्तदात्यांना रक्तदानापासून होणाऱ्या विविध फायद्या विषयी माहिती सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
0 Comments