पाथर्डी – नेहमी प्रमाणे कर्तव्य बजावताना हद्दींच्या रेषात न अडकता कर्तव्याला प्राधान्य देत भूत दया दाखवत पाथर्डी येथील पशुधन विकास अधिकारी तथा गट विकास अधिकारी डॉ जगदीश पालवे यांनी वेलतुरी ता.आष्टी जि.बीड
येथे जावून अडलेल्या गाभण गाईची सीझर करून गाईच्या गर्भाशयातून वासराला बाहेर
काढण्यात यश
मिळवले असून
शेतकऱ्याच पशुधन
वाचवले आहे.
वेलतुरी ता.आष्टी जि.बीड हे गाव पाथर्डी शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे तेथील शेतकरी किसन तारकु गव्हाणे ह्या शेतकऱ्याची गाभण गाय प्रसूती होत नसल्याने तसेच ऐनवेळी जवळपास डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने त्यांनी पाथर्डी पशुधन विकास अधिकारी डॉ जगदीश पालवे यांना फोन वरून वैद्यकिय मदत मागीतली त्यास प्रतिसाद देत डॉ पालवे यांनी वेलतुरी येथील गव्हाणे वस्तीवरील किसन गव्हाणे या शेतकऱ्याच्या घरी गेले. एक लाख रुपये किमतीची गाभण गायीला मंगळवारी सकाळी प्रसव वेदना सुरु झाल्या, स्थानिक शेतकऱ्याच्या मदतीने शेतकरी गव्हाणे यांनी गाय प्रसव होण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले त्यामुळे गव्हाणे यांनी पाथर्डी येथील पशू धन विकास तथा गट विकास अधिकारी डॉ जगदीश पालवे यांना फोन करून वेलतुरी ता आष्टी येथे येण्याची विनंती केली,
दुपारी डॉ जगदीश पालवे यांनी गव्हाणे वस्ती येथे पोहचून गाईच्या प्रसुती साठी प्रयत्न सुरु केले परंतु प्राप्त परिस्थिती साधनांचा अभाव असल्याने गाईच्या पोटातील वासरू आकाराने मोठे असल्याने प्रसूती होत नव्हती त्यामुळे गाय दगावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे गव्हाणे शेतकरी कुटुंब चिंतेत होते. मात्र डॉ जगदीश पालवे यांनी समयसूचकता दाखवत गाईचे सीझर करण्याचा निर्णय घेतला व वासराला गाईच्या पोटातून बाहेर काढण्यात यश मिळवले त्यावेळी परिसरातील बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. यशस्वी रित्या सीझर करून ऐन दिवाळी सणाच्या सुट्टीत शेतकऱ्याच्या एक लाख रुपये किमतीचे पशुधन वाचवल्या मुळे गव्हाणे कुटुंबीयांनी डॉ जगदीश पालवे यांचे आभार मानले आहे.
0 Comments