पाथर्डीत आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान


पाथर्डी -  परिसर स्वच्छ असेल तर आपले आरोग्य चांगले राहते तसेच संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊ नये म्हणून आपले आरोग्य कर्मचारी सन असो किंवा ऊन वारा पाऊस याचा कुठलाही विचार न करता प्रामाणिकपणाने आपले स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करतात म्हणूनच आपण चांगले आरोग्य मय जीवन जगतो असे मत सोसायटीचे संचालक व राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र बोरुडे यांनी केले.

गुरुवारी सकाळी राजेंद्र बोरुडे मित्र मंडळाच्या वतीने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याचा सन्मान करण्यात आला यावेळी बोरुडे बोलत होते.यावेळी आरोग्य निरीक्षक दत्ता ढवळे आरोग्य मुकदम शिवाजी पवार,राजेंद्र बालवे,सुरेश पठाण,शिवाजी बालवे,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब बोरुडे,संतोष वाघमारे,उमेश साखरे,बबलू वावरे,सोमनाथ पाटील बोरुडे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments