अधिकारी घडवणारा तालुका म्हणून पाथर्डीची नवी ओळख – प्रताप ढाकणे

 


पाथर्डी- दुष्काळी भाग म्हणून पाथर्डी ओळखली जायची मात्र या प्रतिकूलतेने आपल्याला घडविले, या भूमीतील संतांनी आचरण शिकविले आणि आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आज तालुक्याची अधिकारी घडवणारा तालुका म्हणून वेगळी ओळख देशात निर्माण झाली असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी केले आहे. 

दिवाळी पाडव्यानिमित्त ढाकणे यांच्या कार्यालयात तालुक्यातील पहिल्या महिला आयपीएस केडरसाठी निवड झालेल्या अश्विनी संतोष सानप सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता पदी तुळशीराम दहिफळे माणगाव जिल्हा रायगड,येथील प्रांतधिकारी कार्यालयातील शिवाजी दहिफळे यांना परोनत्ती तसेच नीट परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल वेदांत दहिफळे,जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक पदीनिवड झालेले शिवाजी कराड,कल्याणराव लवांडे,ज्ञानेश्वर शिरसाठ,सौ सुवर्णा राठोड, मेडिकल संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुहास जरांगे,उपाध्यक्ष संतोष जिरेसाळ,सेक्रेटरी प्रकाश पालवे,निमा संघटनेचे अध्यक्षपदी निवड झालेले डॉ.सुहास उरणकर यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

अँड. ढाकणे म्हणाले कि स्व. बाबूजी आव्हाड, माजी मंत्री बबनराव ढाकणे व स्व. माधवराव नि-हाळी यांनी जुन्या काळात तालुक्यात शिक्षण संस्था काढल्यामुळे खेडोपाडीच्या मुलांची शिक्षनाची व्यवस्था झाली.कालांतराने जिल्हा मराठा व रयत शिक्षण संस्थांनी विद्यालये तालुक्यात आणल्याने शिक्षणासाठी अधिक वाव निर्माण झाला.दुष्काळी तालुका व दूध-तुपाचा तालुका अशीच ओळख पाथर्डीची होती मात्र आज अधिकाऱ्यांचा तालुका अशी नवी ओळख महाराष्ट्रात पाथर्डीची आहे.प्रतिकूलतेने आपल्या सर्वांना घडविले आज तालुक्यातील प्रत्येक गावात उच्च पदस्थ अधिकारी शासकीय सेवेत कार्यरत आहेत ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे.यावेळी अशोक गांधी,टिंकूशेठ कुचेरिया,वैभव दहिफळे,डॉ.दीपक देशमुख,योगेश रासने,दिगंबर गाडे आतिश नि-हाळी, आक्रर आतार,पांडुरंग मंत्री आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. नगरसेवक बंडू बोरुडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments