पाथर्डी
– ( हरिहर गर्जे ) विशिष्ठ ध्येयाने
प्रेरित झालेली माणसे अशक्य वाटणारी कामे प्रयत्नांत सातत्य ठेवले तर सहज पूर्ण
करू शकतात याचे जिवंत उदाहरण पाथर्डी तालुक्यातील युवा शेतकरी नेतुत्व शरद मरकड
आणि त्यांच्या सहकार्यानी राज्यातील पहिली विना अनुदानित दुष्काळी चारा छावणी नंतर
देशातील पहिले विनानुदानित लंपी विलगीकरण छावणी कार्यान्वित करून व यशस्वी रित्या
ती सुरु आहे.
तीन वर्षा पूर्वी पडलेल्या भयाण दुष्काळात पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरात शरद मरकड या युवकाने स्वत खर्च करून पहिली विना अनुदानित चारा छावणी चालवली होती त्यावेळी त्यास प्रशासकीय व राजकीय पातळीवर मोठ्ठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागला होता आता हि सामाजिक जाणीवेतून शरद मरकड व त्यांच्या सहकारी यांनी देशात सुरु केलेलं पहिलं विनानुदानित लंम्पी स्कीन जनावरांचं क्वारंटाईन सेंटरसुरु करताना त्यांना राजकीय व प्रशासकीय अडचणीचा सामना करावा लागत आहे.शरद मरकड यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या लंपी उपचार केंद्रात मरकड हे साधेपणाने कर्मचारी म्हणुन काम करतात यामागील त्यांचा उद्देश देखील त्यांच्या सहकारी वर्गात संघटन शक्ती वृद्धिंगत करणे असाच आहे.
शेतकऱ्याच्या
पशुधनावर लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत असून राज्यात झपाट्याने
लंपी हा आजार पसरत आहे. ह्या आजाराचे प्रमुख लक्षण म्हणजे जनावरांच्या अंगावर दहा
ते वीस मीमी व्यासाच्या गाठी येतात,भरपूर ताप येतो नाकावाटे व तोंडावर चिकट
स्त्राव येतो,जनावर चारापाणी खाणे कमी करतात,जनावराचे दूध कमी होते तर काही जनावरांच्या
पायावर सूज येते व यावर वेळीच उपचार मिळाला नाही तर जनावरे दगावतात व शेतकर्याना
नुकसानीचा सामना करावा लागत आहे. अहमदनगर
जिल्ह्यातील पाथर्डी तालुका हा दुष्काळी
भाग ओळखला जातो,रोजगार शोधण्यासाठी शेतकरी नाईलाजास्तव उसतोड कामगार म्हणून
राज्यात स्थलांतरीत होत असतो.साधारणतः एका शेतकऱ्याकडे दोन बैलं
असतात त्या ठिकाणी जर एखाद्या बैलाला लंम्पी झाला
तर शेतकऱ्याला मोठे नुकसान सहन करावे लागते.
या
उपचार केंद्रात लंम्पी स्कीन आजारावर
शासनाचे पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर लोक
काम करतात.संपूर्ण ट्रीटमेंट ही शासनाच्या आदेशाप्रमाणे चालू असून या केंद्रात लंम्पी
बाधित गाय,बैल शेतकऱ्याच्या घरून ॲम्बुलन्स ने आणून पूर्ण २० दिवसाच्या उपचारानंतर बरी
झाल्यावर पुन्हा घरी सोडली जाते याठिकाणी जनावरांना आयुर्वेदिक उपचार जसे कि प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपई चा
पाल्याचं ज्युस, गुळाचे पाणी पाजणे,वाफ देणे,गरम उब देणे असे उपचार स्वखर्चाने व
लोकवर्गणी मधून केले जातात.
एका
गावामध्ये दोन हजार जनावरे असतील आणि तिथे चार लंम्पी बाधित जनावरे असतील तर शरद
मरकड यांची त्यांची टीम ते बाधित जनावरांना
सेंटर मध्ये घेऊन येतात व विलगीकरण
झाल्याने तेथे राहिलेल्या गावातल्या जनावरांना ह्या आजाराची लागण होत नाही.शुसंवर्धनचे
विभागाचे टीम प्रत्येक गावांमध्ये फिरतात व त्यांच्या पासुन देखील प्रसार होऊ शकतो
म्हणुन बाधित जनावरे एकत्रीत क्वारंटाईन सेंटर मध्ये घेतले तर त्यांना बाहेर
फिरण्याची वेळ येणार नाही.जसे कोवीड मध्ये सर्वांनी पुढे येऊन मदत केली तसेच
सर्वांनी एकत्र येऊन या मुक्या प्राण्यावर दया दाखवावी असे आवाहन शरद मरकड यांनी
केले आहे.
विलगीकरण
कक्ष चालवणारे सर्व जन गरीब शेतकर्यांचे मुलं असून त्यांनी आत्तापर्यंत ४ लाख
रूपये खर्चून हे विलगीकरण केंद्र चालवले आहे.सामाजिक जाणीवेतून या लंपी विलगीकरण
केंद्राला श्री दत्त मंदिर देवगड यांनी ५१ हजार रुपये, नागेबाबा मल्टीस्टेट यांनी अंम्बुलंस
सेवा,म्हस्के सराफ तीसगाव यांनी चारा व पशुखाद्य तसेच गोकुळ दौंड यांनी ११ हजार रुपयांची
मदत केली असून हि मदत कमी पडत आहे त्यामुळे या सामाजिक उपक्रमाला अधिक मदत
करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे .
0 Comments