आ.निलेश लंकेनी घेतली जखमी बोरुडे कुटुंबियांची भेट

 


पाथर्डी – आ.निलेश लंके यांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जुने खेर्डे रोड येथे दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या बोरूडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
पाथर्डी शहराच्या हद्दीतील असलेल्या जुन्या नगरवाट लगत असलेल्या बोरूडे वस्तीवर २९ सप्टेंबर रात्री १०.३० च्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून संदीप नामदेव बोरूडे, देविदास नामदेव बोरूडे, व त्यांच्या आई पार्वती नामदेव बोरूडे यांच्यावर चाकू गुप्ती व तलवार यासारख्या घातक शास्त्राने जोरदार हल्ला करून त्यांना जबर मारहाण केली होती त्यांच्या जवळील लाखोंचे ऐवज जबरदस्तीने काढून घेतला.
या दरोड्याच्या हल्ल्यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले होते.जवळपास या घटनेला एक महिना उलटून गेला तरी देखील या गुन्ह्याचा तपास लागलेला नाही.दिवाळीचा सण असताना देखील आमदार निलेश लंके यांनी येऊन बोरुडे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आधार देऊन मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी मा.नगरसेवक बंडू बोरुडे,शिवशंकर राजळे आदी उपस्तित होते.  

Post a Comment

0 Comments