पाथर्डी
-
तायक्वाँदो सारख्या आत्मरक्षा करणाऱ्या खेळाचे प्रशिक्षण ग्रामीण भागामध्ये सन १९९४ पासून पाथर्डी तायक्वांदो असोसिएशनचे अविरतपणे देत आहेत ही मोठी अभिमानाची बाब असून त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
विद्यार्थी घडविलेले आहेत,आपणही
तालुक्यातील तायक्वांदोच्या
सर्व विद्यार्थ्यांना तायक्वाँदो फाईटचे साहित्य उपलब्ध करून देऊ असे आवाहन अभय आव्हाड
यांनी केले.
पाथर्डी तालुका तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने संत नरहरी महाराज मंदिर पाथर्डी येथे कलर बेल्ट व प्रमाणपत्र वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मा.अभय काका आव्हाड हे बोलत होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोणावळा पोलीस स्टेशन येथे नियुक्त असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक बन्सी कांबळे व मनमाड पोलीस स्टेशन येथे नियुक्त असलेले सोमनाथ वाघमोडे,माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके व माजी नगरसेविका मंगलताई कोकाटे हे उपस्थित होते. यावेळी बन्सी कांबळे यांनी तायक्वांदो खेळाबाबतचे स्वतः विषयीचे अनुभव मुलांना सांगितले व मार्गदर्शन केले.सोमनाथ वाघमोडे यांनी सांगितले की, खेळामुळे आपला सर्वांगीण विकास होतो खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते मुले व्यसनापासून दूर राहतात व सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो.
तायक्वांदो परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे
यलो बेल्ट-, वंशिका पडधरिया,आदिती ससाणे, वेदिका ढाकणे, मधुरा वाघमोडे ,समृद्धी खुटाळे,अवंतिका पंडित ,ईश्वरी कोकाटे , आदिती वनारसे, काव्या चोरडिया, स्नेहल पालवे, सई शिरसाठ,प्रेरणा आव्हाड, मनस्वी साबळे, अनुप्रिता शिरसाट, शिवराज ससाने,निर्मित चौधर, धनंजय खुटाळे,वेदांत दौंड, आरव फलके,श्रद्धेन भालसिंग, सुशांत फुंदे, पृथ्वीराज टकले
ग्रिन बेल्ट- राधिका कोकाटे, आराध्या जेधे,आरोही राजगुरू, अनन्या खरमाटे,श्रुती शेटे,अस्मिता साठे,जान्हवी खोले,श्रीराज शिंदे, सिद्धार्थ आंबेटकर, अधिराज साठे,रुद्र नेहुल,आर्यन राजगुरू,विशाल बळे,निखिल येळाई, तुषार बळे, यशराज शहाणे, श्रेया फुटाणे,अर्जुन शेळके.रेड बेल्ट- गायत्री पवार.
परीक्षक म्हणून सचिन आगळे,रवींद्र शिर्के,शंकर जेधे,गोरक्षनाथ गालम,पप्पू शिरसाठ,अजय शिरसाठ,रामदास जेधे,सुनील शेटे यांनी काम पाहिले.तर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव कौसे यांनी केले तर प्रस्ताविक तायक्वांदो प्रशिक्षक अंबादास साठे यांनी केले तर आभार भारतीताई असलकर यांनी मानले.
0 Comments