पाथर्डी - शहरातील सुवर्णयुग तरूण मंडाळाला राज्य शासनाचा उत्कृष्ठ सार्वजनिक गणेश मंडळ म्हणून राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मुंबई येथील रवींद्र नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला.
अडीच लाख रुपये व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.याप्रसंगी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, मुंबईचे सह पोलिस आयुक्त शिवाजी राठोड,पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उप संचालिका विद्या वाघमारे आदी उपस्थित होते.यदाचा गणेशोत्सव उत्कृष्टपणे साजरा करून वर्षभर समाज उपयोगी उपक्रम साजरे केले,याची राज्य सरकारने दखल घेऊन ग्रामीण भागातील सुवर्णयुग तरूण मंडळाच्या सार्वजनिक गणेश मंडळाला या उत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून गौरव करत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दिले आहे.
यावेळी मंडळांचे अध्यक्ष वैभव शेवाळे, उपाध्यक्ष दिगंबर जोजारे, ओम डागा, बंडू दाणापुरे,अभय गांधी, गणेश बाहेती, आरती शेवाळे,गोपालसिंग शेखावत,अमोल कांकरिया,शाहरुख शेख, मोनिष उदबत्ते, राहुल भगत, गणेश महालकर, योगेश भागवत,दत्ता पंडित, संदीप पानगे,शैलेंद्र दहिफळे,मोनल जोजारे, अमोल नरवणे, दिनेश बोरुडे, ओंकार जोशी, किशोर वैरागकर आदी मंडळाचे कार्यकर्ते पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित होते.
तमाम पाथर्डी तालुक्यातील जनतेने सुवर्णयुग तरूण मंडळाला दिलेले प्रेम त्यामुळे हा पुरस्कार मिळाला असून जिल्ह्याचे आणि तालुक्याची नाव राज्यात उंचवणारा हा पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळे मंडळाला भविष्यात काम करण्याची अधिक प्रेरणा मिळाली असून यापुढे यापेक्षाही जास्त सामाजिक काम करण्याची जबाबदारी वाढली आहे.असे वैभव शेवाळे यांनी सांगितले.
0 Comments