पाथर्डी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील रेशन कार्ड धारकांना दिवाळी निमित्त प्रातीनिधीक स्वरुपात आनंदाचा शिधा वाटप निंवडूगे येथे आमदार मोनिका राजळे यांचे हस्ते करण्यात आले.
आनंदाचा शिधा या योजनेमध्ये पाथर्डी तालुक्यातील ४० हजार व शेवगांव तालुक्यातील ४२ हजार रेशन कार्ड धारकांना लाभ मिळणार आहे. या योजनेत लाभार्थीला रु. १०० रुपयात १ किलो खाद्य तेल, १ किलो रवा, १ किलो चना दाळ व १ किलो साखर मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील रेशन कार्ड धारकांची दिवाळी गोड होण्यास मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबाना लाभ होणार आहे. तरी या योजनांचा लाभ सर्व रेशन कार्ड धारकांनी घेण्याचे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले. या कार्यक्रमास पाथर्डीचे तहसिलदार शाम वाडकर, माजी उपसभापती मनिषा वायकर, पुरुषोत्तम आठरे, चारुदत्त वाघ, पुरवठा निरीक्षक ज्योती अकोलकर, निंवडूगेचे सरपंच विट्ठल कोलते, सोसायटीचे चेअरमन शिलाताई मरकड, खरेदी विक्री संघाचे संचालक उध्दव ससे, विट्ठल मरकड, सिताराम सावंत, दत्तात्रय देशमुख, पांडूरंग भवार आदि कार्यकर्ते उपस्थीत होते.
0 Comments