पाथर्डी प्रतिनिधी:- अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांनी नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व महासंघाच्या वतीने शिंदे यांच्या भूमिकेला महासंघाचा पाठिंबा दर्शवला यावेळी महासंघाचे नगर जिल्हा युवक अध्यक्ष आजीनाथ मोरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले .
यावेळी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर, आजीनाथ मोरे, वास्तु विशारद श्री. आशिषभाऊ, निलेश चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते.
या भेटीमध्ये पवार यांनी शिंदे यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयाला पाठिंबा देत सरकारला शुभेच्छा दिल्या. मराठा समाजाचे प्रलंबित असणारे प्रश्न, आरक्षण व ग्रामीण भागातील मराठा समाजातील आर्थिक व सामाजिक स्थितीसह विविध प्रश्न सोडण्याच्या दृष्टीने सखोल आणि सकारात्मक चर्चा केली व हे प्रश्न सोडविण्याची आग्रही मागणी केली. आपण घेतलेली आदरणीय बाळासाहेबांची आणि आदरणीय दिघे साहेबांच्या भूमिकेला मराठा महासंघाचा आणि समाजाचा नेहमीच पाठींबा राहिला आहे असेही पवार यांनी सांगितले तसेच त्यांनी घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयाचे आणि राज्यभरातून त्यांना मिळत असलेल्या प्रतिसादाचे पवार यांनी कौतुक केले.
या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी आपणास संपूर्ण मदत आणि येणार्या काळात अखिल भारतीय मराठा महासंघाला माझ्या कडुन संपूर्ण सहकार्य असेल अशी ग्वाही दिली. लवकरच अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यव्यापी मेळावा होणार असून त्या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहण्याचा शब्द त्यांनी यावेळेस आम्हाला दिला आहे. अशी माहिती प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक व महासंघाचे जिल्हा युवक अध्यक्ष आजिनाथ मोरे यांनी दिली.
0 Comments