राजेश टोपे यांच्या हस्ते सुवर्णयुग तरुण मंडळाचा सन्मान

 


बोधेगाव - राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अँड प्रताप ढाकणे यांच्या पुढाकाराने शहरातील सुवर्णयुग तरूण सुवर्णयुग तरुण मंडळाने गणेशोत्सवात राज्यस्तरीय दुसरा क्रमांक पटकावल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्या हस्ते संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यावर सोमवारी संपन्न झाला.यावेळी प्रताप काका ढाकणे प्रभावती ढाकणे ऋषिकेश ढाकणे, शिवशंकर राजळे, वैभव दहिफळे, आदी सह कार्यकर्ते  उपस्थित होते.


पाथर्डी शहरातील व तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना व व्यक्तींनी मंडळातील पदाधिकारी व सदस्य यांचा सत्कार सन्मान केला आहे. पाथर्डी शहरातील स्नेहबंध ग्रुपच्या वतीने शहरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मध्ये तर मंडळाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ सुहास उरणकर, अँड हरीहर गर्जे, श्रीकांत काळोखे, संतोष साप्ते, धीरज गुंदेचा, सुशील बाहेती, अंबादास साठे, अय्युब सय्यद, एकनाथ ढोले, डॉ ज्ञानेश्र्वर दराडे हे उपस्थित होते.पाथर्डी तालुका सुवर्णकार संघटनेच्या वतीने ही संत नरहरी महाराज मंदिरात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी विष्णू चिंतामणी, सुरेश शहाणे ,योगेश घोडके, मधुकर मानूरकर, मधुकर शहाणे, बाळासाहेब शहाणे, परशुराम पंडित, मोदक मानूरकर, सिद्धांत मानूरकर, लक्ष्मण पावटेकर आधी सुवर्णकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे व मित्रधन परिवाराच्या वतीने पाथर्डी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सुवर्णयुग तरुण मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. यावेळी प्रा.रमेश मोरगावकर,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नासिर शेख, दिगंबर गाडे ,सिताराम बोरुडे, हुमायून आतार, देवा पवार, योगेश रासने,वैभव बोरुडे, शुभम सुपेकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments