पाथर्डी
- येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु.कोमल
वाकळे हिने गुजरात येथे पार पडलेल्या ३६ व्या
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग क्रीडाप्रकारा मध्ये ८७
किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तिचा भव्य स्वागत व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
नॅशनल
गेम्स मध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी अहमदनगर जिल्ह्यातील ती
पहिली खेळाडू असून या स्पर्धेत वेटलिफ्टिंग मध्ये महाराष्ट्र संघास एक सुवर्ण व एक
कास्यपदक मिळाले. कोमल वाकळे हिचे महाविद्यालयात आगमन होताच जल्लोषात फटाक्याची
आतीषबाजी करण्यात आली. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी तिच्यावर पुष्पवृष्टी केली. पार्थ
विद्या प्रसारक मंडळाचे तसेच पाथर्डी तालुका वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष अभय
आव्हाड यांच्या हस्ते तिचा सन्मान व सत्कार करण्यात आला. भारताच्या प्रतिष्ठित व
सर्वात मोठ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 7
वर्षानंतर करण्यात आले व या स्पर्धेचे
उदघाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. अभूतपूर्व अशा वातावरणात आपल्या महाविद्यालयाकडून झालेल्या
सत्कारामुळे कोमल भारावून गेली व या सत्काराप्रती तिने महाविद्यालयाचे
आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, श्री
विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा शरद मेढे,
शारीरिक शिक्षण संचालक व अहमदनगर
डिस्ट्रिक्ट वेटलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव प्रा. विजय देशमुख, प्रा.डॉ.
बबन चौरे, प्रा. डॉ. अशोक कानडे,
प्रा. दत्तप्रसाद पालवे, प्रा.
डॉ प्रशांत साळवे, प्रा. सचिन शिरसाट व महाविद्यालयाचा सर्व स्टाफ व विद्यार्थी
उपस्थित होते.
0 Comments