शेवगावात नोंदीसाठी १८ हजारांची लाच मागणाऱ्या दोघावर गुन्हा दाखल


शेवगाव – तक्रारदार यांनी २०२० मध्ये माळीवाडा,शेवगाव येथे गट न.१५१२/१/अ/१ मध्ये २ गुंठे जमीन खरेदी केलेली आहे,त्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यामध्ये तक्रारदार यांच्या नावाची नोंद लावून देण्यासाठी आरोपी क्र१ आरीफ पठाण याने पंचासमक्ष सजा-शेवगाव चे तलाठी याना २०,०००/- रुपये द्यावे लागतील असे म्हणून तडजोडी अंती १८०००/-रु लाच मागणी केली,तसेच आरोपी क्र २विजय धनवडे संगणक ओपरेटर याने सदरचे पैसे हे भाऊसाहेबला मॅनेज करण्यासाठी द्यावे लागतात, जेवढे मागितले तेवढे द्यावे लागतील तरच तुमची नोंद होईल असे म्हणून लाच मागणी केली, म्हणून आज रोजी दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन शेवगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कार्यवाही अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक शरद गोर्डे,पोलीस उप अधीक्षक, हरीष खेडकर,गहिनीनाथ गमे,पोलीस नाईक,रमेश चौधरी, पोलीस अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पो.ना राहुल डोळसेयांच्या पथकाने पोलीस अधीक्षक नाशिक सुनील कडासने,अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे,पोलीस उपाधीक्षक सतिश भामरे,यांच्या मार्गदर्शना खाली सापळा कार्यवाही केली आहे.

Post a Comment

0 Comments