पाथर्डी – यंदा दसऱ्या नंतर दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात
असल्याने बाजारपेठेत खरेदी निमित्त नागरिकांनी प्रचंड गर्दी केली असून समाधान कारक
आर्थिक उलाढाल होत असल्याने व्यापारी वर्ग खुश असला तरी परतीच्या पाऊसाने मोठ्या
प्रमाणावर शेतमालाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल असून जीवनावश्यक किराणा सामानांचे भाव गगनाला
भिडल्याने मध्यमवर्गीयाचे घरगुती आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
कोरोना टाळे बंदी नंतर तब्बल दोन वर्षांनी मोकळ्या वातावरणात दिवाळी
साजरी होत असल्याने हौशीने नागरिक खरेदी साठी बाजार पेठेत दाखल झाले असल्याने
आठवडा भरापासून बाजारपेठेत कमालीची गर्दी झाली आहे.सोन्याचे भाव अस्थिर असले तरी सोण्याचे
दागिने खरेदी साठी झुंबड उडाली आहे. दिवाळी,पाडवा आणि भाऊबीजी निमित्त नवीन कपडे
घेण्यासाठी देखील शहरातील कापड दुकाने फुल्ल झाले आहेत,अगदी सकाळी ७ वाजले पासून
रात्री १२ वाजे पर्यन्त शहरातील कापड दुकाने गर्दीने फुलून गेली आहेत.विविध कापड
दुकानातून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बक्षीस योजना ठेवण्यात आल्या आहेत.
दसऱ्या नंतर दिवाळी सणाला झेंडू,शेवंती यासारख्या फुलांना मोठ्या
प्रमाणावर मागणी असते मात्र यंदा चायना बाजारातील आकर्षित कृत्रिम झेंडू व शेवंती फुले
बाजारात आली असून ग्राहक कृत्रिम फुलांच्या माळा घेणे पसंत करत असल्याने शेतकऱ्याच्या
नैसर्गिक झेंडू फुलांची मागणी कमी होवून झेंडू प्रती किलो ५० ते ७० रुपये भावानेच विकला
जात आहे. यातच अवकाळी पाऊसाने झेंडू फुलांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकर्यांना
कमी भावाने फुलांची विक्री करावी लागत आहे.पाथर्डी तालुयातील बाजारपेठ शेतकरी ग्राहकावर
अवलंबून आहे मात्र कापूस,स्वायाबीन हि पिके अति पाऊसाने खराब झाल्याने शेतकऱ्याकडे
खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दीपोत्सव असला तरी यंदा मात्र पारंपारिक तेल वाती पणत्या यापेक्षा ग्राहक विजेवर चालणाऱ्या लाईट माळी आकाश कंदील खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याने स्थानिक कुंभारकाम करणारे तसेच छोटे दुकानदार व पारंपारिक साहित्य निर्मिती करणाऱ्या कारागीरांची दिवाळी मात्र गारगार आहे.
दसऱ्या नंतर दिवाळी सणाला झेंडू,शेवंती यासारख्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते मात्र यंदा चायना बाजारातील आकर्षित कृत्रिम झेंडू व शेवंती फुले बाजारात आली असून ग्राहक कृत्रिम फुलांच्या माळा घेणे पसंत करत असल्याने शेतकऱ्याच्या नैसर्गिक झेंडू फुलांची मागणी कमी होवून झेंडू प्रती किलो ५० ते ७० रुपये भावानेच विकला जात आहे. यातच अवकाळी पाऊसाने झेंडू फुलांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकर्यांना कमी भावाने फुलांची विक्री करावी लागत आहे.पाथर्डी तालुयातील बाजारपेठ शेतकरी ग्राहकावर अवलंबून आहे मात्र कापूस,स्वायाबीन हि पिके अति पाऊसाने खराब झाल्याने शेतकऱ्याकडे खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
0 Comments