शेवगाव- निवडणुकीच्या काळात महापुरुषांची नाव घेणाऱ्यांनी सहकारी साखर कारखान्यांना आपल्या बापांची नावे देऊन
खाजगी संस्थांने निर्माण केली त्यासाठी साखर कारखानदारांच्या विरोधात ग्रामपंचायत
पासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेलं भूत उतरवण्यासाठी निर्णायक भूमिका घेऊन संस्थानिकांना
हद्दपार केल्याशिवाय सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसल्याने सर्व
संघटनांनी एकत्र येऊन वज्रमुठ बांधण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी केले आहे .
ऊस उत्पादनाचा उत्पादन खर्च लक्षात घेता शेतकऱ्याच्या ऊसाला एफआरपी अधिक तीनशे रुपये प्रति टन जादा भाव जाहीर करावा साखर कारखान्यांनी ठेवीच्या नावावर कपात केलेले शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत साखर कारखान्याच्या कारभारात पारदर्शकता आणावी यासह विविध मागण्यासाठी शेतकरी संघटना एकवटल्या होत्या.
शेवगाव
मध्ये ऊस प्रश्न काळे दिवाळी साजरी करून राज्यभर आंदोलनाची ठिणगी दिवाळीच्या दिवशी
पेटण्याची आशा कार्यकर्त्यांना होती या
आंदोलनात शेवगाव, पाथर्डी,नेवासा
तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने
करण्यात आले होते .आजच्या आंदोलनात वंचित बहुजन
आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे
जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे,प्रशांत
भराट , मेजर अशोक भोसले बाळासाहेब फटांगरे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे
राज्यसचिव अॅडव्होकेट सुभाष लांडे राज्य कार्यकारणी सदस्य संजय नांगरे आम आदमी
पार्टीचे शरद शिंदे, किसन आव्हाड मनसे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे शिवसेनेचे
तालुकाप्रमुख अॅडव्होकेट अविनाश मगरे ,
वंचित बहुजन आघाडी महिला तालुकाध्यक्ष
संगीता ढवळे, अरविंद सोनटक्के,
प्यारेलाल शेख आदी प्रमुख कार्यकर्ते
सहभागी झाले होते.
0 Comments