माणिकदौंडीत आदिवासींना विविध दाखल्यांचे वितरण




माणिकदौंडी - राष्ट्रनेता हे राष्ट्रपिता सेवा पंधरवडा आयोतीत फेरफार अदालत आणि अदिवासी जमातीच्या लोकांना जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड आणि बँक पासबुक वाटप कार्यक्रम प्रांतअधीकारी देवदत्त केकाण तसेच तहसीलदार शाम वाडकर यांचे उपस्थीतीत माणिकदौंडी महसूलभवन येथे पार पडला.


दोन वर्षांपासून महाराजस्व अभियान अंतर्गत वेळोवेळी पाठपुरावा करून माणिकदौंडीच्या मंडळ अधिकारी वैशाली दळवी,तलाठी राजु मेरड,पोलीस पाटील वसंत वाघमारे यांनी माणिकदौंडी परिसरातील भिल्ल अदिवासी सामाजातील लोकांच्या समास्या जाणुन घेत.वेळोवेळी वाडी वस्तीवर जाउन पाठ पुरावा करून भिल्ल समाजाच्या जवळ पास ४० कुटूंबियांना जातीचे दाखले आधार कार्ड आणि राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून दिले.या सर्व कागदपत्रांचे वाटप प्रांत अधीकारी देवदत्त केकाण व तहसीलदार शाम वाडकर यांचे हस्ते वाटप करुन वंचीत घटकातील लोकांना मुख्य प्रवादात आणण्याचे काम केले.

या वेळी बोलताना प्रांत अधीकारी केकाण यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व माणिकदौंडी सारखा प्रयोग पाथर्डी तालुक्यातील इतर तलाठ्यांनी करावा असे अवाहन केले.यावेळी सरपंच सिमा शायद पठाण, उपसरपंच समीर पठाण, प्रहारचे मुकुंद आंधळे, अॅड हरीहर गर्जे, ग्रामपंचायत सदस्य सविता धावड, रमीज पटेल, नईम पठाण, अमोल शेळके, ग्रामसेवक सचीन दळवी, प्रा.रावसाहेब मोरे, शिवाजी मोहीते, शायद पठाण, सावकार गर्जे व पंजाब नॅशनल बँकेचे प्रतीनीधी मनोज आंधळे उपस्थीत होते.

यावेळी नवरात्री निमीत्त महीलांचा सन्मान करण्यात आला तथा भिल्ल समाजातील विधवा महिला वंदना भवरे हीला साडी चोळी देत नवदुर्गा चा सन्मान केला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळ अधिकारी दळवी मैडम यांचे अध्यक्षतेखाली तलाठी राजु मेरड, जाटदेवळाच्या तलाठी पुष्पलता बडे, चिंचपुरचे तलाठी हर्ष गवई, भालगावचे तलाठी वसीम पटेल, जांभळीचे तलाठी भोकरे भाउसाहेब तसेच कोतवाल लतीफ शेख, शब्बीर शेख आणि जमादार यांनी विषेश प्रयत्न केले. कार्यकमाचे सुत्रसंचालन सदानंद सुतार यांनी तर आभार प्रदर्शन मधुकर धावड यांनी केले.

Post a Comment

0 Comments