अष्टीमिनिमित्त् मोहटा गडावर होम हवन संपन्न


पाथर्डी  प्रतिनिधी :  शारदीय नवरात्रात्सवामध्ये आज महा आष्टीमिनिमित्त् मोहटा देवस्थानात  होम हवन  कुमारीका पुजन,  सुवासिनींची ओटी भरणे आदी  कार्यक्रम संपन्न झाले. देवस्थान समितीच्या पुरोहितांसह आळंदी, बीड येथील पुरोहितांनी पौरोहित्य  केले.

प्रधान जिल्हा न्यायाधीश तथा शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर यार्लागड्डा  व सौ मालती यार्लागड्डा तसेच देवस्थान समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी व सौ गीता गोसावी यांचे हस्ते होम हवन पूजा संपन्न झाली.  गेल्या आठ दिवस राज्याच्या विविध भागातून सुमारे 15 लाख भाविकांनी देवस्थानला भेट दिली. 

कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आणखी किमान पाच लाख भाविक  भेट देतील असा अंदाज देवस्थान समितीचा आहे.  बीड, गेवराई, पुणे, औरंगाबाद, पारनेर येथून विविध उद्योजक राजकीय नेते आदींनी भाविकांना मोफत देवी दर्शन घडविले.  आज पुणे येथील एका नगरसेवकाने त्यांच्या विभागातील अडीचशे लग्जरी बसेस भरून भाविकांना दर्शन घडविले आमदार निलेश लंके यांनी सात दिवस एक हजाराहून अधिक बसेस द्वारे भाविकांना मोहटा  देवीचे दर्शन घडवले.  

दुपारी देवस्थान समितीच्या यज्ञ शाळेत होमहवनाला  प्रारंभ झाला वेदमंत्राचा घोष भाविकांचा जयजयकार देवीच्या निरोप घेण्याची आठ दिवस साधना करीत असलेल्या महिला भाविकांची घरी परतण्याची लगबग झाली असे वातावरण नवरात्रोत्सवातील पावित्र्यात भर घालणारे ठरले यावेळी भूषण साखरे, सुहास रामदासी,  भास्कर देशपांडे,  महेश झेंड ,  नागेश घायाळ,  प्रवीण जोशी,  नारायण सुलाखे या पुरोहितांनी पौरोहित्य केले काशिनाथ पवार यांनी संबळ तर गोपीनाथ शिंदे यांनी पारंपारिक सेवा सादर केली.पारंपारिक सेवा सादर केली. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी एकादशी देवीची यात्रा असून शुक्रवारी कलाकारांच्या हज-या  व कुस्त्यांचा हंगामा होऊन कोजागिरी पौर्णिमेला यात्रा उत्सवाची सांगता होईल.

Post a Comment

0 Comments