बोधेगाव - येथे ग्रामीण रुग्णालय असूनही मुख्य वैद्यकीय अधिक्षक व अधिकार्यासह मंजूर २५ पैकी १३ पदे रिक्त असल्याने नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने पुरेशा सुविधा वेळेवर मिळत नाहीत. रुग्णाची नेहमी हेळसांड होऊन गैरसोयमुळे आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण बोजवारा उडाला आहे. रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली असल्याने रिक्त पद भरावीत अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शेवगावच्या वतीने करण्यात आली आहे.
बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी व साधन सामुग्री नसल्याने रुग्णालय शोभेचे वस्तू बनले आहे.बोधेगाव व परिसरातील नागरिकांना अनेक वर्षापासून सुविधा उपलब्ध होत नाही.सर्व सामान्य व गोर गरीबांना त्याचा काहीही फायदा होत नसून त्यांना खाजगी रुग्णालयात महाग उपचार करावे लागतात.गावातील महत्वाच्या प्रश्नाकडे सर्वच लोकप्रतिनिधीनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे वंचित बहुजन आघाडी बोधेगाव लवकरच प्रा.किसन चव्हाण (राज्य उपाधक्ष)यांच्या मार्गदर्शनात व बन्नू भाई शेख(जिल्हा उपाध्यक्ष,)संगीताताई ढवळे (महीला तालुकाध्यक्ष)धोंडीराम मासालकर(शहराध्यक्ष बोधेगाव)यांच्या नेतृत्वात व वंचित चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी व परिसरातील नागरिकांसह मोठे जन आंदोलन करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आली असून दि.३०/११/२०२२ रोजी आंदोलनाची सुरुवात केली जाणार आहे.
0 Comments