नेवासा तालुक्यात १३ तेरा ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

नेवासा : ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ दरम्यान मुदत संपणाऱ्या तालुक्यातील तेरा ग्रामंपाचयतींच्या  निवडणूका जाहीर झाल्या असून १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे.

तालुक्यातील सुरेशनगर,चिंचबन,हिंगोणी येथे सात सदस्यपदासाठी तसेच हंडीनिमगाव,खुपटी, गोधेगाव, भेंडा खुर्द,अंमळनेर,शिरेगाव येथे नऊ सदस्यपदासाठी निवडणूक होत असून कांगोणी येथे अकरा सदस्य तर वडाळा बहिरोबा,माळीचिंचोरा,माका,येथे तेरा सदस्यपदासाठी निवडणूक होत आहे. या तेरा ग्रामपंचायतींचा कालावधी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत संपणार असल्याने या ग्रामंपचायतींच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मुदत असून ५ डिसेंबर रोजी छाननी होणार आहे तर ७ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.१८ डिसेंबर मतदान तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.


Post a Comment

0 Comments