पाथर्डी – कुटुंबातील शैक्षणिक तसेच प्रसासकीय कामासाठी येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांच्या जन्माची तसेच मृत्यूची नोंद करणे अत्यावश्यक असून आपल्या नोंद न करण्याच्या छोट्याश्या चुकांमुळे संपूर्ण कुटुंबावर विपरीत परिणाम होतो,हिंदू वारसा कायद्याने सर्वांनी आपल्या मिळकतीचे वाटपपत्र हे कायदेशीर आहे किंवा नाही हे तपासून घेतले पाहिजे असे मार्गदर्शन न्यायाधीश व्ही.आय. शेख यांनी रांजणी गावकऱ्यांना केले.
पाथर्डी तालुका विधी सेवा
समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने मौजे रांजणी तालुका पाथर्डी येथे मंगळवारी कायदेविषयक शिबिर
संपन्न झाले.यावेळी पाथर्डी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.आय शेख ग्रामस्थांना कायदेविषयक
मार्गदर्शन करताना बोलत होते.या शिबिरासाठी पाथर्डी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. आर.एन.
खेडकर, अॅड. निलेश दातार,अॅड. अय्याज शेख, अॅड. अंबादास खेडकर, अॅड. नितीन वायभासे
यांच्या सह रांजणी येथील सरपंच तसेच महिला ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित
होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. वायभासे यांनी केले तर आभारप्रदर्शन अॅड. रामदासजी भताने यांनी केले.
0 Comments