सापडलेले अडीच तोळे सोन्याचे लॉकेट केले परत

पाथर्डी - पालिकेतील लिपिक किशोर पारखे व व्यापारी अशोक देखणे यांनी सकाळी फिरताना सापडलेले अडीच तोळे सोन्याचे लॉकेट प्रामाणीकपणाने मूळ मालकाला म्हणजे परत करून आजच्या घडीला देखील प्रामाणिक पणाचे दर्शन घडवले आहे.

रविवारी पहाटे नेहमीप्रमाणे पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी लक्ष्मण पवार मित्रांसह फिरायला गेले.वनदेव केंद्राच्या कमानी बाहेरील गणपती मंदिराच्या शेडमध्ये व्यायाम, योगासने करून दिवस उगवल्यावर ग्रुप सह ते माघारी परतले.मात्र पवार यांच्या नकळत त्यांच्या गळ्यातून सोन्याचे अडीच तोळ्याचे सोन्याचे लॉकिट खाली रस्त्यावर पडले.त्याच वेळी वनदेव मॉर्निग ग्रुपचे सदस्य किशोर पारखे व अशोक देखणे यांना व्यायाम करताना ते सोन्याचे लॉकेट सापडले त्यांनी काही काळ तेथेच बसून मूळ मालक शोध घेत येईल या आशेने वाट बघितली पण कोणी आले नाही.दुपारच्या वेळी पवार यांना आपण लॉकेट व्यायाम करताना काढून ठेवल्याचे आठवताच त्यांना अचानक धक्का बसून ते घामाघुम झाले.क्षणाचाही विलंब न करता त्यांनी व्यायाम पॉईंट वर सहकारी पोलिसांसह धाव घेत सर्वत्र शोध घेतला पण लॉकेट मिळून आली नाही.फिरायला येणाऱ्या पैकी काही जणांकडे त्यांनी चौकशी केली पण कोणीच समाधानकारक माहिती दिली नाही.पारखे यांना वाटले की याबाबत जाहीर वाच्यता केली तर कोणीही हक्क सांगून वाद वाढवतील त्यापेक्षा सायंकाळपर्यंत वाट बघून त्यानंतर पोलिसांकडे जाऊन वस्तू जमा करू असा विचार त्यांनी केला. त्यादरम्यान पवार यांचा पारखे यांना फोन आला चौकशी केली त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता पारखे यांनी वस्तू मला सापडली घाबरू नका घेऊन जा असे सांगितले आनंदी होऊन पवार यांनी त्यांचे मित्र माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके यांच्या हस्ते पारखे व देखणे यांचा गौरव केला,सायंकाळी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण,सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील व रामेश्वर कायंदे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे वस्तू परत करणाऱ्या दोघांचा सत्कार केला.

यावेळी बोलतांना पोलीस कर्मचारी लक्ष्मण पवार यांनी सांगितले की किशोर पारखे आणि देखणे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे अडीच तोळ्याचे लॉकेट परत केले. एवढे प्रामाणिक माणसे मी माझ्या कार्यकाळात असूनही बघितले नाहीत त्या दोघांचा आम्ही पोलिस दला तर्फे गौरव केला‌. तसेच वनदेव मॉर्निग ग्रुपचे अध्यक्ष अविनाश मंत्री यांनी सांगितले की आम्ही लवकरच श्री पारखे आणि देखणे या दोघांचा सत्कार करणार आहोत.  


Post a Comment

0 Comments