चिंचपूर ईजदे येथे दिवसा घरफोडी

पाथर्डी – तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या चांदीच्या दागिन्या सह रोख रक्कम असा ८५,००० /- रुपये किमतीचा ऐवज चोरून नेहला असून त्याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

८५,००० हजार रुपये रोख तसेच ३६७५०/- रु किमतीची सव्वा तोळे वजनाची सोन्याची चैन तसेच ३००००/- रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या आंगठ्या १० ग्रँम वजनाच्या तसेच ९,०००/- रुपये किमतीची नाकातील सोन्याच्या दोन नथ सुमारे सुमारे तीन ग्रँम वजनाच्या तसेच ६,०००/- रुपये किमतीची गळ्यातील सोन्याच्या दोन पेट्या प्रत्येकी एक ग्रँम वजनाच्या तसेच ९,०००/- रुपये किमतीच्या लहाण बाळाच्या गळ्यातील सोन्याच्या पेटी अर्धा ग्रँम वजानाची,कानातील सोन्याच्या बाळ्या एक ग्रँम वजनाच्या, सोन्याच्या मनगट्या दीड ग्रँम वजनाच्या तसेच १५,००/- रुपये किमतीचे लहान बाळाचे पायातील चाळ सुमारे दोन भार वजनाचे, चांदीचे वाळे तीन भार वजनाचे तसेच असे एकूण १,७७,२५०/- रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी विष्णू खेडकर हे त्याचे घराला कुलुप लावुन शेतात गेले असता कोणतरी अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन कपाटातील वरील वर्णनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली असल्या बाबत फिर्यादी विष्णु पाटीलबा खेडकर,रा. चिचपुर ईजदे ता.पाथर्डी, जि.अ.नगर यांनी फिर्याद नोंदवली असून पोलीस तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments