व्यायामाचे साहित्य पडून असल्याने तरुणात नाराजी

करंजी- तरुणांत व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणुन शासनाने गावा-गावात व्यायामाचे साहित्याचे वाटप केले मात्र चिचोंडी येथील व्यायामाचे साहित्य धुळखात पडुन असल्याने चिचोंडी व परिसरातील युवकांमध्ये तिव्र नाराजी पसरली आहे. 

तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, देश, राज्य, गावा-गावातील तरुण खेळामध्ये पुढे राहुन गावाचे नाव मोठे करावे यासाठी शासनाने विषेश योजना राबवुन प्रत्येक गावातील व्यायामाच्या साहित्याचे वाटप केले. पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथेही जिल्हा परिषदेच्या क्रिडा विभागाकडून येथील तरुणांना व्यायामासाठी साहित्य देण्यात आले आहे. मात्र याचा कोणताही फायदा तरुणांना झाला नसुन हे साहित्य ग्रामपंचायतीच्या कार्यालयात धुळखात पडुन आहे. हे व्यायामाचे साहित्य येथील तरुणांना कधी मिळणार? ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ठेवुन ग्रामपंचायत काय साध्य करणार आहे? असे प्रश्न संतप्त तरुणांनी उपस्थित केले असुन येत्या १५ दिवसात हे साहित्य तरुणांना उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त संतोष गरुड, दिपक आव्हाड, अनिकेत जऱ्हाड, पृथ्वी आव्हाड, जुने शेख, रोहन जऱ्हाड, शुभम आव्हाड, किशोर जऱ्हाड, रामदास जऱ्हाड, आनंद शिंदे, मयुर शेलार, रितेश काळे,संतोष आव्हाड, तुषार आघावणे,भरत जऱ्हाडसह गावातील अनेक तरुणांनी केला आहे.


याबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष गरुड यांनी सांगितले की येत्या १५ दिवसात धुळखात पडलेले व्यायामाचे साहित्य युवकांना वापरण्यास दिले नाही तर येथील तरुणासह आपण पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन करु.

Post a Comment

0 Comments