पाथर्डी - तालुक्यातील माणिकदौंडी, जाटदेवळा, शिंदेवाडी व परिसरातील तांडे या भागात रानडुक्करांनी उच्छाद मांडला असुन शेतातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान करीत आहेत, पाळीव जनावरे व मानवावर ही प्राणघातक हल्ले ही जंगली रान डुक्करे करीत आहेत. त्यामुळे आधीच आस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या संकटातून वाचवावे. शेतमाल, पाळीव जनावरे व माणसांच्या जीवाचे संरक्षण करण्यासाठी उपाय योजना राबवण्यात व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या परिसरातील नुकसानग्रस्त पीडीत शेतकऱ्यांनी वनविभाग व महसूल विभाग व कृषी विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अनुस्पर्श फाउंडेशन, सक्षम शेतकरी गट, राजे शेतकरी गट व महाराणा शेतकरी गट अशा विविध शेतकरी गटांनी परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने वन विभागांला निवेदने दिले. यावेळी पाथर्डी पंचायत समितीचे मा.सदस्य सुनील ओव्हळ,जाटदेवळे गावचे सरपंच अंकुश आठरे, महादेव रहाटे, उध्दव घोशिर, प्रविण राठोड, संपत शिंदे, बाजीराव राठोड, संजय राठोड, विदुर पवार, अशोक बहिरवाळ, मयूर पवार, बबन चव्हाण, महादेव पवार आदी उपस्थित होते.या बाबत बोलताना घोशिर म्हणाले की, मागील काळामध्ये ढगफुटी, सततचा पाऊस, नैसर्गिक बदलाची अनियमिता, शेतीसाठी लागणारी अनियमित वीज पुरवठा, शासकीय हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी, इतकंच नव्हे तर वन्य प्राण्यांचा वावर , त्यांच्यापासून होणारे पिकाचे नुकसान व त्यांनी केलेले जीवघेणे हल्ले या सर्व संकटाचा धनी म्हणजेच शेतकरी झाला आहे.
या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी नाही, उपजीविकेचे दुसरे साधन नाही, शेतीमध्ये येणाऱ्या पिकाला काडीमोल किंमत
नाही,
वन्यप्राणी
त्यांच्या खाण्यासाठी अक्षरक्ष: पिकांचे नुकसान करतात. आज पर्यंत ज्वारी, बाजरी,मूग,तुर गहू, व हरभरा तसेच अन्य कोणतेही कडधान्य वन्यप्राणी येऊ देत नव्हते , भुईमूग या पीकासाठी योग्य अशा जमिनीचा पोत
असून आजमितिस वन्यप्राण्यांच्या नुकसानीमुळे भुईमूग पीक या भागातून नामशेष झालेले
आहे,
परंतु आता कापूस, कांदा,फळबागा या पिकाकडे सद्यस्थितीमध्ये शेतकरी वन्यप्राण्यांच्या होणाऱ्या
नुकसानीमुळे या पिकांकडे वळलेला दिसत होता पण, आता कापूस,
कांदा, फळबाग या पिकांचे सुद्धा नुकसान
करत असल्याने आता शेतकऱ्यांनी शेतीमध्ये काय पिकवावे आणि कसा आपला उदरनिर्वाह
भागवावा हा यक्ष्य प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलेला आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे
की शासनाने नुकसानग्रस्त भागाची समक्ष पाहणी करून पंचनामे करावेत व आम्हाला आर्थिक
मोबदला नाही मिळाला तरी चालेल परंतु, त्यावरील आपल्या स्तरावरून शेतकऱ्यांसाठी असणारे तारकुंपणे, स्वयं-रक्षणासाठी हऱ्यारे परवाना यासारख्या
योग्य त्या उपाययोजना अमलात आणाव्या अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.
0 Comments