करंजी - पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील ३९
गावे राहुरी मतदार संघाला जोडलेली असून
राहुरी मतदार
संघात मिरी गट व तिसगाव जिल्हा परिषद गटातील काही गावांचा समावेश असला तरी या भागातील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न वांबोरी चारी हा असून वांबोरी चारीच्या रखडलेल्या
प्रश्नाभोवती या
भागातील राजकारण गेल्या ५० वर्षापासुन फिरत आहे.
१९७७ साली माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी या भागाला मुळेचे पाणी मिळाले पाहिजे म्हणुन लढा उभा केला. मिरी येथुन या भागातील १० हजार शेतकऱ्यांना पायी घोडेगाव येथे नेवून तेथील पाट फोडला. त्यावेळी नगर-औरंगाबाद रस्त्यावर अभुतपुर्व असा रस्तारोको करण्यात आला होता. त्यामध्ये कै. नामदेव आव्हाड, रामभाऊ अकोलकर, जनार्धन गवळी सारख्या या भागातील अनेक नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतरही हा लढा दुसर्या पिढीनेही चालुच ठेवला. कै. मोहनराव पालवे, काशिनाथ पाटील लवांडे, अरुणसर आठरे पाटील, संभाजीराव पालवे यांनी या प्रश्नासाठी मोलाचे योगदान दिले.
डोंगराच्या कडे-कडेने मुळेचे पाणी वांबोरी चारीव्दारे या
भागाला मिळाले पाहिजे यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली, अखेर सरकारने या प्रश्नात लक्ष घालुन हा
प्रश्न मार्गी लावण्याचे ठरविले.आणि भागातील लोकांच्या तोंडाला पाने पुसली वांबोरी
चारीऐवजी बंद लोखंडी पाईपव्दारे या भागातील १०२ पाझर तलावात एकाचवेळी पाणी
सोडण्याची देशातील पहिली योजना कार्यान्वित करण्यात आली.
या योजनेपासून डोंगराच्या कडेची गावे मात्र वंचित राहिली. योजनेतील त्रुटी, तसेच अकार्यक्षम नेतृत्वामुळे वांबोरी
चारी पाईप लाईनव्दारेही या भागाला कधी नियमित पाणी मिळाले नाही. हाच धागा पकडुन व
या भागातील लोकांच्या मागणीकडे लक्ष देवुन आमदार तनपुरे यांनी यात लक्ष घातले, सतत दोन वर्षापासून या भागातील पाझर
तलावात पाणी सोडले. पण गर्भगिरी डोंगराच्या कुशीत वसलेली अनेक गावे मात्र या
योजनेपासुन वंचित राहिल्याने या भागातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी वांबोरी चारी टप्पा दोनची मागणी केली.
यामधुन वांबोरी चारी टप्पा दोनचा जन्म झाला. वांबोरी चारी टप्पा दोनला प्रशासकीय
मान्यता मिळविण्यात विद्यमान आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांना यश आले या कामासाठी संभाजी पालवे यांनी २००७ पासून वेळोवेळी पाठपुरावा केला या कामाचे टेंडर निघण्यास प्रशासकीय मान्यता देखील मिळाली मात्र अनाहूत पणे या साधारण १५० कोटीच्या कामाला वेळेत मुहूर्त लाभला नाही. सवगतीने काम करणाऱ्या शासनास ही योजना पुर्ण करण्यास किती कालावधी लागेल हे
मात्र काळच ठरविल. नाही तर पाथर्डीसारख्या दुष्काळी भागातील लोकांना संघर्ष नविन
नाही तो त्यांच्या पाचीला पुजलेला आहे. या भागातील एक पिढी बरबाद करणाऱ्या या
योजनेभोवती मात्र या भागातील राजकारण गेल्या ५० वर्षापासुन फिरत आहे.
0 Comments