पाथर्डी तालुक्यातील मिरी विविध कार्यकारी सोसायटीने सभासदांना १० टक्के
लाभांश वाटपाचा कार्यक्रम आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आला
त्यावेळी आमदार. मोनिकाताई राजळे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
रावसाहेब शेळके होते.
आमदार मोनिकाताई राजळे आपल्या प्रमुख भाषणात बोलताना पुढे म्हणाल्या, या भागात अतिवृष्टीने शेतकर्यांच्या
पिकाचे मोठे नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास गेल्याने या भागातील शेतकरी
हवालदिल झाले आहेत. या भागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे
करण्यात आले आहेत. या शेतकर्यांना जास्तीत-जास्त नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी
आपण प्रयत्न करु असे सांगुन त्या पुढे म्हणाल्या विविध कार्यकारी सहकारी
सोसायट्यांना खेळते भांडवल मिळाले पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे असेही त्यांनी
शेवटी सांगितले.
आपल्या प्रास्ताविकात सुभाषराव गवळी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख
सभासदासमोर मांडताना सोसायटीची बॅक पातळीवरील वसुली १०० टक्के झाली आहे. सोसायटीने
यावर्षी सभासदांना १० टक्के डिव्हिडंड वाटण्याचे ठरविले असल्याचे सांगुन या भागातील पिकांचे अतिवृष्टीने मोठ्या
प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगुन शेतकर्यांना अधिकाधिक मदतीची मागणी केली. यावेळी
आमदार मोनिकाताई राजळे,पंचायत समितीचे सदस्य राहुल गवळी,संस्थेचे चेअरमन शिवाजीराव गवळी, व्हा. चेअरमन छायाताई तोगे,संचालक विजय जाधव, भागिनाथ गवळी, प्रशांत गवळी, जगन्नाथ वेताळ, राजु झाडे, नवनाथ दारकुंडे, संभाजी झाडे, दानियल मिरपगार, आसाराम वीर, झुंबरबाई दाणे,स्वीकृत सदस्य राजेंद्र गवळी, रायभान म्हस्के तसेच नंदु बनकर, बाबासाहेब निमसे,साहेबराव गवळी, विजय गुंड,एकनाथ झाडे, बाबा निंबाळकर, मनोज मेहेर, मोहन सोलाट, बंडु झाडे, सुभाष गवळी,कारभारी गवळी,संजय शिंदे, बापुराव वेताळ,जयसिंग सोलाट, अन्सार शेख, जालिंदर गवळी,शुभम मोटे,भाऊसाहेब लोंढे, सह. बँकेचे वांढेकर, आव्हाड, संस्थेचे सचिव
एस.आर.मुळेसह अनेक मान्यवर व सभासद हजर होते. शेवटी सुभाष गवळी यांनी आभार मानले.
0 Comments