पाथर्डी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार व शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरणाऱ्या पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निषेधार्थ पाथर्डी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शहरातील नाईक चौकात ठिय्या मांडत मंत्री सत्तार व पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारत सत्तार यांच्या पुतळ्यांचे दहन करून आंदोलन केले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी महाराष्ट्राच्या पुरोगामी व सुसंस्कृत राजकारणाला या शिंदे फडणवीस सरकारमधील या मंत्र्यांनी हरताळ फासला असून जनतेची कामे करण्याऐवजी बेताल वक्तव्य करून हे मंत्री प्रसिद्धी मिळवत आहेत महिलांविषयी, माता भगिनींविषयी अशा भाषेत वक्तव्य करणे हे यांना शोभा देणारे नाही. या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व या पुढील काळात या मंत्र्यांना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही. सत्तार याचा मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा घ्यावा असे राजळे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या
निषेध सभेत महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खरपूस शब्दात मंत्री
सत्तार व पाटील यांचा व राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या कामकाजाचा समाचार घेत या
दोन्ही मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी केली.यावेळी
कार्यकर्त्यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शहराध्यक्ष योगेश रासने, देवा पवार, महारुद्र कीर्तने, पांडुरंग शिरसाट, सिताराम बोरुडे, हुमायून आतार, ज्येष्ठ नेते
लक्ष्मण डोमकावळे, माजी नगरसेवक चांद मणियार, राष्ट्रवादी युवती आघाडीप्रमुख ज्योती
जेधे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख भगवानराव दराडे, युवा सेनेचे सचिन
नागापुरे, नवनाथराव चव्हाण,
शहर संघटक संतोष मेघुंडे, भाऊसाहेब धस, काँग्रेसचे जुनेद
पठाण, जालिंदर काटे,
आनंद सानप, अजय पाठक, महेश दौंड, अतिश निराळी, आक्रम आतार, एमपी आव्हाड, आनिकेत निनगुरकर
उबेद आतार, आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0 Comments