करंजी - नगर येथील डाॅ.अनभुले हाॅस्पिटल व सावली चॅरिटेबल फौंडेशन तसेच भोसे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवारी भोसे येथे मोफत नेत्ररोग निदान शिबीर पार पडले या शिबीरात संगणकाव्दारे १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
पाथर्डी तालुक्यातील भोसे येथील या शिबिराचा शुभारंभ भोसे गावचे सरपंच विलासराव टेमकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच विलासराव टेमकर यांनी डाॅ. अनभुले हाॅस्पिटल व सावली चॅरिटेबल फौंडेशन यांच्या या उपक्रमाचे कौतुक करुन अशा शिबिरांचा ग्रामीण भागातील लोकांना मोठा फायदा होत असल्याचे सांगितले. यावेळी भोसे व परिसरातील १५० रुग्णांनी संगणकाद्वारे नेत्र तपासणीचा लाभ घेतला. या शिबिरात ४० रुग्णांना तसेच ज्या रुग्णांच्या डोळ्यांना नंबर लागला आहे. अशा रुग्णांना अल्पदरात चष्म्याचे वाटप करण्यात आले. तर ३० रुग्णांना मोतीबिंदु व लेन्ससाठी नियोजन करण्यात आले. या शिबिरात डाॅ. दिलीप भालेराव, डाॅ. मनिषा भालेराव, सावली शिंदे, सुमन जगताप, सावली जाधव आदींनी रुग्णांची तपासणी व सेवा केली. यावेळी सरपंच विलासराव टेमकर, उपसरपंच संदिप साळवे, अशोक टेमकर, वसंतराव वारे, भाऊसाहेब टेमकर,सतिष वारे, ठकन टेमकर, प्रशांत टेमकर, व ग्रामसेवक आशा काळे, ऊषा शिंदेला अनेक मान्यवर व महिला हजर होत्या.
0 Comments