शेवगाव- देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिनाचे औचित्य साधून येथील नानासाहेब भारदे मराठी शाळेत १४ नोव्हेंबर रोजी 'बालआनंद मेळावा' आयोजित करण्यात आला होता, या बालआनंद मेळाव्याचे उद्घाटन शेवगाव न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश श्रीम.एस.यु.जागुष्टे यांच्या हस्ते झाले.
यावेळी भारदे शाळेतील
इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी व्यवहार ज्ञान वृद्धिंगत व्हावे यासाठी भाजीपाला,फळे, नाष्ट्याचे विविध
खाद्य पदार्थ विक्रीस ठेऊन व्यवहार ज्ञान,व्यावसायिक कौशल्य समजाऊन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दिवाणी
न्यायाधीश श्रीम.एस.यु.जागुष्टे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला व
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मनसोक्त खरेदीही केली.
याप्रसंगी सहदिवाणी
न्यायाधीश श्रीम. व्ही. डोबे ,सहदिवाणी न्यायाधीश एम. ए.बेद्रे,सहाय्यक गट विकास
अधिकारी दीप्ती गाडे, प.स.विस्तार अधिकारी पाटेकर साहेब,शेवगाव तालुका बार
असोशियनचे अध्यक्ष ॲड.के.के.गलांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाला
संस्थेचे अध्यक्ष रमेशजी भारदे,संस्थेचे सचिव शामकाका भारदे,संस्थेचे सहसचिव हरीशजी भारदे,शाळा समिती अध्यक्षा सौ.रागिणीताई भारदे, ॲड.शैलेश भारदे,बाळासाहेब भारदे
हायस्कूलचे प्राचार्य शिवदास सरोदे आदींनी हजेरी लावत कार्यक्रमाचे कौतुक केली.कार्यक्रमाच्या
यशस्वितेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका पठाण मॅडम,कटके मॅडम,शिंदे सर,जाधव मॅडम,गुंजाळ मॅडम यांच्याबरोबर बालगोपाळांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments