शेवगाव - आव्हाणे बुद्रक (ता. शेवगाव) येथे स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिरात संकष्ट
चतुर्थीनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी
पैठणहून आणलेल्या गंगाजलाने 'श्री'ना महाभिषेक करण्यात आला. नामदेव भिसे
यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दुपारी भाविकांना भिसे यांच्याकडून फराळाची
व्यवस्था करण्यात आली. सायंकाळी सहा वाजता विकास महाराज औटी यांचे कीर्तन झाले.
सायंकाळी सात वाजता एकनाथ ढोले व अरुण घोरपडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी स्वयंभू निद्रिस्त गणपती ट्रस्टचे अध्यक्ष मालोजी भुसारी व सरचिटणीस अर्जुन
सरपते उपस्थित होते.
0 Comments