करंजी- "खंडोबाचे चांगभले, येळकोट येळकोट जय मल्हार" च्या घोषणांनी लोहसर परिसर दणाणून गेला होता, आज लोहसर येथील बहिरोबा मंदिरासमोर संपुर्ण गावाचा एकच आगळा-वेगळा जागरण गोंधळाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पार पडला.
या महिन्यात
शस्ष्टीनिमित्त प्रत्येक गावातील, खेडोपाडी घरा-घरातुन जागरण गोंधळाचे कार्यक्रम आयोजित केले जात
असतात. हिंदीचे आराध्य दैवत खंडोबाचा आशिर्वाद आपल्यावर कुटुंबावर रहावेत म्हणुन
घरा-घरातुन जागरण गोंधळाचे कार्यक्रम आयोजित केलेले असतात. परंतु पाथर्डी
तालुक्यातील लोहसर येथील जागरण गोंधळाचा कार्यक्रम नेहमीच या भागातील लोकांसाठी
आकर्षणाचा विषय ठरलेला असतो. प्रत्येक घरा-घरात जागरण गोंधळाचा कार्यक्रम न करता
संपुर्ण ग्रामस्थ एकत्र येवुन येथील जागृत कालभैरवनाथ मंदिरासमोर एकत्रित जागरण
गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करतात. चंपाषष्टी आदल्या दिवशी गावातील महिला-पुरुष
एकत्रितपणे जेजुरी या ठिकाणी जावुन दरवर्षी भंडारा खोबरे घेवुन देवदर्शन करुन येत
असतात. या कार्यक्रमामुळे गावात एकोपा आणि एकजूट निर्माण होते. या जागरण
गोंधळामुळे येळकोट,येळकोट जय मल्हारच्या घोषणांनी लोहसर परिसर दणाणून गेला होता.
परिसर भंडाऱ्याने पिवळा झाला होता. या जागरणाच्या कार्यक्रमात गोरक्ष गिते यांनी
अन्नदानाचे काम केले.
या कार्यक्रमास अनिल
गीते, गोरक्ष गिते, रावसाहेब वांढेकर,
बाबाजी गीते, जयराम गिते, बाजीराव दगडखैर,देवेंद्र गीते, राजेंद्र दगडखैर, पोपट गिते, महादेव बाठे, दिलीप दगडखैर, गणेश गीते, राजेंद्र वांढेकरसह
अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. लोहसर
गावात होणाऱ्या या एकत्रित जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामुळे गावात एकोपा व एकजूट
निर्माण होवून एकमेकात आपुलकीची भावना निर्माण होते असे अनिल गिते यांनी सांगितले.
0 Comments